धर्मांतराच्या विरोधात कायदा करणे आवश्यकच ! – देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल

  • केजरीवाल यांना धर्मांतरविरोधी कायद्याचे महत्त्व लक्षात येण्यामागे केवळ हिंदूंमध्ये हिंदुत्वाविषयी होणारी जागृतीच कारणीभूत आहे, हे लक्षात घ्या ! – संपादक
  • आता केजरीवाल यांनी लव्ह जिहाद, समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण, बांगलादेशी मुसलमानांची घुसखोरी आदींविषयीही बोलले पाहिजे ! – संपादक
देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल

जालंधर (पंजाब) – धर्म सर्वांचे व्यक्तीगत सूत्र आहे. प्रत्येकाला कोणत्याही देवाला पूजण्याचा अधिकार आहे. भीती दाखवून कुणाचेही धर्मांतर करणे अयोग्यच आहे. धर्मांतराच्या विरोधात कायदा करणे आवश्यकच आहे; मात्र अशा कायद्याद्वारे कुणाला भीती दाखवून त्रास देण्यात येऊ नये, असे विधान देहलीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी केले. ते येथे व्यापारी आणि उद्योगपती यांच्या कार्यक्रमात बोलत होते.