आंध्रप्रदेश राज्यात बालाजी देवस्थानाला अनुसरून ‘श्री बालाजी’ आणि श्री सत्य साईबाबा यांच्यावरून ‘श्री सत्य साई’ या नावाने नवे जिल्हे !

‘श्री बालाजी’ आणि श्री सत्य साईबाबा

अमरावती (आंध्रप्रदेश) – आंध्रप्रदेश राज्य सरकारने अधिसूचना जारी करून राज्यातील १३ जिल्ह्यांची संख्या आता २६ झाल्याचे घोषित केले. यामध्ये बालाजी देवस्थानाला अनुसरून ‘श्री बालाजी’ आणि श्री सत्य साईबाबा यांच्यावरून ‘श्री सत्य साई’ अशी नावे नव्या जिल्ह्यांना देण्यात आली आहेत.

चांगले प्रशासन आणि संबंधित क्षेत्रांच्या विकासाच्या हितासाठी सरकारने नवे जिल्हे बनवण्याचा निर्णय घेतला आहे (चित्रावर क्लिक करा)

‘मान्यम्, अल्लूरी सीताराम राजू, अनाकापल्ली, काकीनाडा, कोना सीमा, एलुरु, एन्टीआर्, बापटिया, पलनाडु, नंदयाल, अन्नामय्या’, अशी अन्य ११ जिल्ह्यांची नावे आहेत.

‘चांगले प्रशासन आणि संबंधित क्षेत्रांच्या विकासाच्या हितासाठी सरकारने नवे जिल्हे बनवण्याचा निर्णय घेतला आहे’, अशी माहिती राज्याचे मुख्य सचिव समीर शर्मा यांनी अधिसूचनेद्वारे दिली.