बिहारमध्ये रेल्वे परीक्षेत घोटाळ्याचा आरोप करत तरुणांकडून हिंसक आंदोलन

रेल्वे गाडीला लावली आग !

असे हिंसक आंदोलन करून सरकारी संपत्तीची हानी करणारे तरुण रेल्वेमध्ये नोकरी मिळाली, तर रेल्वेची सुरक्षा करतील का ? – संपादक 

गयामध्ये आंदोलक तरुणांनी भभुआ-पाटणा इंटरसिटी एक्सप्रेसला आग लावली

पाटलीपुत्र (बिहार) – भारतीय रेल्वेच्या आर्.आर्.बी.-एन्.टी.पी.सी. आणि ग्रुप डी परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप करत तरुणांनी हिंसक आंदोलन केले. गयामध्ये आंदोलक तरुणांनी प्रजासत्ताकदिनी दगडफेक करत भभुआ-पाटणा इंटरसिटी एक्सप्रेसला आग लावली. अनेक ठिकाणी आंदोलन करणार्‍या तरुणांवर पोलिसांनी लाठीमार केला. आंदोलक तरुणांनी श्रमजीवी एक्सप्रेसची हानी केली. जहानाबादमध्ये तरुणांनी एक प्रवासी रेल्वेगाडी थांबवून आंदोलन केले. या वेळी विद्यार्थ्यांनी रेल्वे रुळावरच तिरंगा फडकावला. तरुणांच्या आंदोलनामुळे रेल्वे मंत्रालयाने एन्.टी.पी.सी. आणि लेव्हल-१ ची परीक्षा स्थगित केली आहे. तसेच एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. ही समिती उत्तीर्ण आणि अनुत्तीर्ण तरुणांशी बोलून एक अहवाल रेल्वे मंत्रालयाला पाठवणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.