‘मी ऐकले आहे परात्पर गुरु डॉ. आठवले यांची प्रकृती बरी नाही. वारंवार परात्पर गुरु डॉक्टर आमचे त्रास स्वतःवर घेऊन आम्हाला कोणताही त्रास होऊ देत नाही आणि स्वतः त्रास सहन करत आहेत. परात्पर गुरु डॉक्टर पृथ्वीवर धर्मसंस्थापना करण्यासाठी अवतरले आहेत. हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, हे त्यांचे स्वप्न आहे. हे स्वप्न पूर्ण व्हायलाच हवे. ते पूर्ण झाल्यानंतर त्यांना सर्वाेत्तम आनंद होईल; म्हणून त्यांनी हिंदु राष्ट्राची पहाट पहाणे अनिवार्य आहे. यासाठी ‘त्यांच्या जागी मी देवाकडे जावे’, असे मला वाटते. ज्याप्रमाणे परात्पर गुरु देशपांडेकाकांनी त्याग केला, तसाच त्याग करून मी एक साधक फूल बनून गुरुमाऊलीच्या चरणी अर्पण होऊ इच्छितो.’
– श्री. राजेश आनंद कोरगावकर, म्हापसा, गोवा. (१५.७.२०२०)