भारताच्या मानचित्राविषयी (नकाशा) वैशिष्ट्यपूर्ण संशोधन करणारे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय
‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘पिप (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी)’ या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने केलेली वैज्ञानिक चाचणी
‘व्यक्तीच्या छायाचित्रातून प्रक्षेपित होणार्या स्पंदनांवरून त्याच्या आध्यात्मिक स्थितीविषयी कळू शकते. एखाद्याचे साधना आरंभ करण्यापूर्वीचे आणि अध्यात्मात चांगली प्रगती केल्यानंतरचे (सत्त्वगुण वाढल्यानंतरचे) अशा दोन छायाचित्रांतून प्रक्षेपित होणार्या स्पंदनांचा तुलनात्मक अभ्यास केल्यास त्या व्यक्तीतील आध्यात्मिक स्तरावरील पालट लक्षात येतो. हा पालट जाणण्यासाठी सूक्ष्मातील कळणे आवश्यक असते. उच्च पातळीचे संत सूक्ष्मातील जाणू शकत असल्याने ते प्रत्येक घटकातील स्पंदनांचे अचूक निदान करू शकतात. येथे लक्षात घेण्याचे सूत्र म्हणजे व्यक्तीच्या सौंदर्याचा आणि सात्त्विकतेचा संबंध नसतो. दिसायला सुंदर नसलेल्या; पण सात्त्विक असलेल्या व्यक्तीकडून सुंदर दिसणार्या; पण सात्त्विक नसलेल्या व्यक्तीच्या तुलनेत चांगली स्पंदने जाणवतात. व्यक्तीच्या संदर्भात छायाचित्रातून जे कळू शकते, ते राष्ट्राच्या संदर्भात मानचित्रातून (नकाशातून) कळू शकते. गेल्या १०० वर्षांत भारतात अनेक राजकीय घडामोडी झाल्या. परिणामी भारताच्या मानचित्रात (नकाशात) अनेक पालट झाले; पण ‘आध्यात्मिक स्तरावर भारताच्या स्थितीत काही पालट झाला का ?’, हे जाणून घेण्यासाठी ‘अखंड भारताचे मानचित्र (नकाशा)’ आणि ‘सध्याच्या भारताचे मानचित्र (नकाशा)’ यांच्यातून प्रक्षेपित होणार्या स्पंदनांचा वातावरणावर होणारा परिणाम विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी २१.१०.२०१६ या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात एक चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी ‘पिप (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी)’ तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात आला. या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने वस्तू आणि व्यक्ती यांच्या ऊर्जाक्षेत्राचा (‘ऑरा’चा) अभ्यास करता येतो. या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे. |
१. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन
या चाचणीत आरंभी चाचणीस्थळातील वातावरणाचे ‘पिप’ तंत्रज्ञानाद्वारे छायाचित्र घेतले. ही ‘मूलभूत नोंद’ होय. त्यानंतर अनुक्रमे अखंड भारताचे मानचित्र (टीप १) आणि सध्याच्या भारताचे मानचित्र (टीप २) ठेवून ‘पिप’ छायाचित्रे घेतली. या ‘पिप’ छायाचित्रांचा तुलनात्मक अभ्यास केल्यानंतर ‘दोन्ही मानचित्रांतून प्रक्षेपित होत असलेल्या स्पंदनांचा वातावरणावर काय परिणाम होतो ?’, हे समजले.
टीप १ – अखंड भारताचे मानचित्र (नकाशा) : भारताच्या (वर्ष १९२० पूर्वीच्या) अविभाजित स्वरूपाला ‘अखंड भारत’ संबोधले जाते. तिबेट, नेपाळ, भूतान, म्यानमार, बांगलादेश, श्रीलंका आणि पाकिस्तान हे सर्व देश अखंड भारताचे अविभाज्य घटक होते. हे मानचित्र (नकाशा) तेव्हाच्या अखंड भारताचे आहे.
टीप २ – सध्याच्या भारताचे मानचित्र (नकाशा) : वर्ष १९२० नंतर अखंड भारताचे अनेकदा विभाजन म्हणजे फाळणी झाली. परिणामस्वरूप तिबेट, नेपाळ, भूतान, म्यानमार, बांगलादेश, श्रीलंका आणि पाकिस्तान भारतापासून विलग झाले. हे मानचित्र (नकाशा) सध्याच्या भारताचे आहे.
१ अ. अखंड भारताच्या मानचित्राच्या तुलनेत सध्याच्या भारताच्या मानचित्रातून आध्यात्मिकदृष्ट्या त्रासदायक स्पंदने प्रक्षेपित होणे : चाचणीतील ‘पिप’ छायाचित्रांच्या प्रभावळीतील सकारात्मक आणि नकारात्मक स्पंदने दर्शवणारे रंग अन् त्यांचे प्रमाण पुढे दिले आहे.
टीप १ : घटकाच्या अंतर्बाह्य स्तरांवरील नकारात्मक स्पंदने नष्ट करण्याची आणि सकारात्मक स्पंदनांची वृद्धी करण्याची क्षमता
टीप २ : घटकाच्या केवळ बाह्य स्तरांवरील नकारात्मक स्पंदने नष्ट करण्याची आणि सकारात्मक स्पंदनांची वृद्धी करण्याची क्षमता वरील सारणीतून पुढील सूत्रे लक्षात येतात.
१ अ १. मूलभूत नोंद – सनातन आश्रमातील सात्त्विक वातावरणामुळे सकारात्मक स्पंदनांचे प्रमाण अधिक दिसणे : कलियुगातील सर्वसाधारण वास्तूमधून सकारात्मक स्पंदनांपेक्षा नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होण्याचे प्रमाण अधिक असते. मूलभूत नोंदीच्या प्रभावळीत (म्हणजे वातावरणाच्या मूलभूत प्रभावळीत) सकारात्मक स्पंदनांचे एकूण प्रमाण ६८ टक्के आणि नकारात्मक स्पंदनांचे एकूण प्रमाण ३२ टक्के होते. ही चाचणी अत्यंत सात्त्विक अशा सनातन आश्रमात केलेली असल्याने वातावरणाच्या मूलभूत प्रभावळीत सकारात्मक स्पंदनांचे एकूण प्रमाण नकारात्मक स्पंदनांपेक्षा अधिक आहे.
१ अ २. अखंड भारताच्या मानचित्रातून वातावरणात पुष्कळ प्रमाणात चैतन्याची आणि पवित्रतेची स्पंदने प्रक्षेपित होणे : अखंड भारताच्या मानचित्राच्या प्रभावळीत सकारात्मक स्पंदनांचे एकूण प्रमाण ८० टक्के आणि नकारात्मक स्पंदनांचे एकूण प्रमाण २० टक्के होते. वातावरणाच्या मूलभूत प्रभावळीच्या तुलनेत अखंड भारताच्या मानचित्राच्या प्रभावळीत सकारात्मक स्पंदनांचे प्रमाण १२ टक्क्यांनी अधिक होते. एवढेच नव्हे, तर या प्रभावळीत उच्च सकारात्मक स्पंदने दर्शवणार्या रंगांपैकी चैतन्याचा पिवळा आणि पवित्रतेचा निळसर पांढरा हे रंग अधिक प्रमाणात दिसत होते आणि सूक्ष्म स्तरावरील आध्यात्मिक उपायक्षमता असलेला पोपटी रंगही थोड्या प्रमाणात दिसत होता. त्यामुळे ‘अखंड भारताच्या मानचित्रातून वातावरणात आध्यात्मिकदृष्ट्या पुष्कळ लाभदायक स्पंदने प्रक्षेपित होतात’, असे म्हणता येईल.
१ अ ३. सध्याच्या भारताच्या मानचित्रातून वातावरणात सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होण्याचे प्रमाण अखंड भारताच्या मानचित्राच्या तुलनेत पुष्कळ घटणे : सध्याच्या भारताच्या मानचित्राच्या प्रभावळीत सकारात्मक स्पंदनांचे एकूण प्रमाण ६२ टक्के आणि नकारात्मक स्पंदनांचे एकूण प्रमाण ३८ टक्के होते. अखंड भारताच्या मानचित्राच्या तुलनेत सध्याच्या भारताच्या मानचित्रातील एकूण सकारात्मक स्पंदनांचे प्रमाण १८ टक्क्यांनी घटले होते. सध्याच्या भारताच्या मानचित्राच्या प्रभावळीत सकारात्मक स्पंदने दर्शवणार्या रंगांपैकी चैतन्याचा पिवळा रंग अल्प प्रमाणात दिसत होता आणि उच्च सकारात्मक स्पंदने दर्शवणारे निळसर पांढरा अन् पोपटी हे रंग दिसत नव्हते. यावरून ‘अखंड भारताच्या मानचित्राच्या तुलनेत सध्याच्या भारताच्या मानचित्रातून आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक स्पंदने पुष्कळ अल्प प्रमाणात प्रक्षेपित होतात’, असे लक्षात येते.
२. चाचणीतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण
२ अ. सध्याच्या भारताच्या तुलनेत अखंड भारतात तीर्थक्षेत्रे अधिक प्रमाणात असल्याने आणि प्रजा धर्माचरणी अन् साधना करणारी असल्यामुळे वातावरण सात्त्विक असणे : अखंड भारतात चैतन्य आणि पावित्र्य यांची स्त्रोत असणारी तीर्थक्षेत्रे अधिक प्रमाणात असल्यामुळे वातावरणाची सतत शुद्धी होत असे. आताच्या तुलनेत पूर्वी समाज अधिक प्रमाणात धर्माचरणी आणि साधना करणारा असल्याने सात्त्विकतेचे प्रमाण आताच्या तुलनेत अधिक होते. तेव्हा राजकीयदृष्ट्या भारत पारतंत्र्यात होता; पण त्या काळच्या बहुसंख्य लोकांमध्ये प्रखर राष्ट्र आणि धर्म प्रेम होते. त्यांच्यात स्वसुखाचा त्याग करून स्वातंत्र्यासाठी सर्वस्वाचे बलीदान करण्याची सिद्धता होती. गुन्हेगारी, भ्रष्टाचार यांचे समाजातील प्रमाण, तसेच जल-वायू आदी नैसर्गिक घटकांचे प्रदूषण सांप्रत काळाच्या तुलनेत तेव्हा अल्प होते. याचा एकत्रित परिणाम म्हणून अखंड भारताच्या मानचित्रातून पुष्कळ प्रमाणात आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायी स्पंदने प्रक्षेपित झाली.
२ आ. सध्याच्या भारतातील शासनकर्त्यांनी प्रजेला धर्माचरण आणि साधना न शिकवल्यामुळे वातावरणातील सात्त्विकता घटणे : वर्ष १९२० पासून भारताचे अनेक वेळा विभाजन झाल्यामुळे काही महत्त्वाची तीर्थक्षेत्रे भारतापासून विलग झाली. त्याचा सध्याच्या भारताला आध्यात्मिकदृष्ट्या तोटा झाला. सध्याचा भारत राजकीयदृष्ट्या स्वतंत्र आहे; पण सध्या बहुसंख्य लोकांमध्ये स्वसुखाला सर्वाेच्च प्राधान्य देणारी आत्मकेंद्रित वृत्ती अधिक प्रमाणात आढळते. शासनकर्त्यांनी भारताला ‘निधर्मी’ राष्ट्र घोषित केले. परिणामी या देशाला धर्माचे अधिष्ठान उरले नाही. शासनकर्त्यांनी स्वातंत्र्यप्राप्तीनंतर समाजाला साधना न शिकवल्याने समाजाचे आध्यात्मिक, तसेच नैतिकदृष्ट्याही अधःपतन झाले. सध्या गुन्हेगारी आणि भ्रष्टाचार यांनी परिसीमा गाठली आहे. शहरीकरणामुळे जल-वायू आदी नैसर्गिक घटकांचे प्रदूषण पुष्कळ वाढले आहे. याचा एकत्रित परिणाम म्हणून भारताच्या सध्याच्या मानचित्रातून आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक स्पंदने प्रक्षेपित होण्याचे प्रमाण अल्प झाले आहे.’
– श्री. रूपेश लक्ष्मण रेडकर, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय (१५.११.२०१६)
ई-मेल : [email protected]
अखंड भारत आणि खंडित भारत यांच्या मानचित्रातील सूक्ष्मातील भेद दर्शवणारी ‘पिप (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी)’ तंत्रज्ञानाच्या साहाय्याने घेतलेली छायाचित्रे !
‘पिप’ छायाचित्रे
सूचना १ : ही वातावरणातील प्रभावळीची चाचणी असल्याने ‘पिप (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी)’ छायाचित्र क्र. २ आणि ३ यांची तुलना मूळच्या प्रभावळीशी (छायाचित्र क्र. १ शी) करतांना छायाचित्रांतील पटल, तसेच छायाचित्रे यांवरील रंग येथे ग्राह्य धरलेले नाहीत. सूचना २ : ‘पिप’ छायाचित्रात पोपटी किंवा पांढरा (निळसर पांढरा) हे उच्च सकारात्मक स्पंदनांचे दर्शक असलेले रंग दिसू लागल्यास काही वेळा पिवळा, गडद हिरवा किंवा हिरवा या सर्वसाधारण सकारात्मक स्पंदनांच्या दर्शक रंगांचे प्रमाण घटते किंवा ते रंग पूर्णपणे दिसेनासे होतात. हा चांगला पालट समजला जातो; कारण त्या वेळी सर्वसाधारण सकारात्मक स्पंदनांची जागा त्यापेक्षाही उच्च प्रतीच्या सकारात्मक स्पंदनांनी घेतलेली असते. |