भारताच्या राज्यघटनेत धर्मनिरपेक्षता नाही. राज्यघटनेत पंथनिरपेक्ष शब्द आहे. हिंदु धर्माची व्याख्या ऑक्सफर्ड शब्दकोषानुसार धर्म म्हणजे ‘कॉस्मिक लॉ’ म्हणजे सर्व जगाला लागू होणारा नियम अशा अर्थी आहे. इतका व्यापक अर्थ सांगणारा हिंदु धर्म आहे. पंथाची व्याख्या ‘एखादी श्रद्धा किंवा विश्वासाची पद्धत, एकाच्या आज्ञेनुसार सर्व चालते तो म्हणजे पंथ. ‘सेक्युलर’चा अर्थ पंथनिरपेक्ष आहे.
‘सेक्युलर’ शब्दाचा विदेशातील अर्थ नास्तिक असा होतो. भारत ‘सेक्युलर’ म्हणजे नास्तिक करायचा नाही आहे, असे डॉ. आंबेडकर आणि जवाहरलाल नेहरू यांचे मत होते. त्यामुळे त्यांचा ‘सेक्युलर’ शब्दाला विरोध होता. डॉ. आंबेडकर यांनी घटनेत ३६८ ‘आर्टिकल’ दिले आहे. कालसुसंगत पालट योग्य त्या संसदीय पद्धतीने करावेत, यासाठी ही सोय आहे. त्यामुळे वर्ष १९७६ मध्ये आणीबाणीच्या काळात ४२ वी सुधारणा म्हणून राज्यघटनेत सर्व संसदीय नियम डावलून पालट करणे संविधानिक कसे ? ते चुकीचे आहे. याविषयी कोणी बोलत नाही. या शब्दाची व्याख्याच केलेली नाही. हा शब्द राज्यघटनेच्या प्रस्तावनेत (प्रीॲम्बल) घातला. प्रस्तावना हे जनतेचे वचन आहे. त्यात ‘ आम्ही भारताचे नागरिक’ (वुई द पिपल) असे म्हणून जनता वचन देते. त्यामुळे ते शासनकर्ते त्यात थेट पालट करू शकत नाहीत.
वर्ष १९७३ मध्ये केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य खटल्यात १३ न्यायाधिशांच्या खंडपीठाने कोणत्याही शासनाला राज्यघटनेत सुधारणा करायचा अधिकार जरी असला, तरी संविधानाच्या मूलभूत आराखड्याला धक्का पोचेल, असा पालट ते करू शकत नाही, असा उल्लेख केला होता. मात्र वर्ष १९७६ मध्ये राज्यघटनेच्या प्रस्तावनेतच पालट केला. हा राज्यघटनेचा अपमान कोणी का म्हणत नाही ?
संकलक – श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
हिंदु कोण हे ‘हिंदु कोड बिल’मध्ये दिलेले असणेराज्यघटनेच्या घटनेत २५(२) सीएच् – यात हिंदु अंतर्गत शीख, जैन आणि बौद्ध येतात. हिंदु कोड बिलअंतर्गत १९५५ ‘हिंदु मॅरेज ॲक्ट’मध्ये ‘सेक्शन’ २ मध्ये हिंदु कोण याविषयी डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिहितात ‘हिंदु म्हणजे परदेशातून आलेले जे ख्रिस्ती, मुसलमान आणि ज्यू सोडून अन्य सर्व हिंदूच. तसेच शीख, जैन, बौद्ध त्याचप्रमाणे वीरशैव लिंगायत, ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज, आर्य समाज हे धर्मत: हिंदूच आहेत.’ तरीही ‘हिंदु कोण ?’, असा प्रश्न विचारला जातो. – श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती |