गड-दुर्गांवर अनधिकृत मजार, दर्गे, थडगे बांधल्याने होणारे इस्लामीकरण रोखण्यासाठी अतिक्रमण तात्काळ हटवावे !

कुर्डूवाडी (सोलापूर) येथील राष्ट्र आणि धर्म प्रेमी यांचे पोलीस आणि प्रशासन यांना निवेदन

पोलीस उपअधीक्षक डॉ. विशाल हिरे यांना निवेदन देतांना धर्मप्रेमी

कुर्डूवाडी (जिल्हा सोलापूर), २२ जानेवारी (वार्ता.) – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने प्लास्टिकचे ध्वज, तिरंग्याच्या रंगाचे मास्क विक्री करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करा, तसेच महाराष्ट्रातील गड-दुर्गांवर अनधिकृत मजार, दर्गे, थडगे बांधून होणारे इस्लामीकरण रोखण्यासाठी पुरातत्व विभागाचे पथक पाठवून सर्व अतिक्रमणे तात्काळ हटवा, या मागण्यांचे निवेदन येथील पोलीस आणि प्रशासन यांना देण्यात आले. हे निवेदन प्रांताधिकारी ज्योती कदम, पोलीस उपअधीक्षक डॉ. विशाल हिरे आणि पोलीस निरीक्षक विक्रांत तांबे यांनी स्वीकारले.  या वेळी येथील राष्ट्रीय विश्वगामी व्यापारी संघाचे अध्यक्ष व्यंकटेश लंगोटे, संघटक अभिजित उबाळे, तसेच सचिन पवार, बाळासाहेब पवार, सचिन नरुटे, शुभम् उबाळे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. विक्रम घोडके यांसह अन्य धर्म आणि राष्ट्र प्रेमी नागरिक उपस्थित होते.