राऊरकेला (ओडिशा) – सुंदरगड जिल्ह्यातील राऊरकेला-वेदव्यास येथे रहाणारे हिंदुत्वनिष्ठ नीलकंठ मोहंती यांचे १८ जानेवारी २०२२ या दिवशी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते. व्यवसायाने शिक्षक असलेले नीलकंठजी गेल्या ५० वर्षांहून अधिक काळ विश्व हिंदु परिषद, आदित्यवाहिनी, हिंदु जनजागृती समिती तथा अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या माध्यमातून हिंदुसंघटन, धर्मरक्षण, धर्मजागृती तथा राष्ट्ररक्षण यांसाठी अव्याहत कार्यरत होते. राऊरकेला परिसरातील विविध १८ हून अधिक संघटनांना एकत्र करून त्यांनी ‘भारतीय संस्कृती सुरक्षा समिती’ या संघटनेची स्थापना केली. या संघटनेचे ते संस्थापक सचिव होते.
हिंदु जनजागृती समितीच्या कार्याला आवर्जुन सहकार्य करणारे नीलकंठ मोहंती !
हिंदु जनजागृती समितीच्या माध्यमातून होणारी आंदोलने, निवेदन देणे, गुरुपौर्णिमा आदी कार्यक्रमांना नीलकंठ मोहंती हे आवर्जुन सहकार्य करत असत. रामनाथी, गोवा येथे प्रतिवर्षी होणार्या अखिल भारतीय हिंदु अधिवेशनाला ते ४ वेळा, तर वाराणसी येथील हिंदु अधिवेशनाला ते एकदा उपस्थित राहिले होते. वर्ष २०१९ मधील गुरुपौर्णिमा महोत्सवात त्यांचा एक ‘क्रियाशील हिंदुत्वनिष्ठ’ म्हणून हिंदु जनजागृती समितीकडून सत्कार करण्यात आला होता. हिंदु जनजागृती समिती मोहंती कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे, असे समितीने सांगितले.