स्थानिक स्वराज्य संस्थांमधील इतर मागासवर्गीय आरक्षणाविषयी २ आठवड्यांत अंतरिम अहवाल सादर करा !

सर्वोच्च न्यायालयाचा राज्य मागासवर्गीय आयोगाला निर्देश !

सर्वोच्च न्यायालय

मुंबई, २० जानेवारी – स्थानिक स्वराज्य संस्थांमधील इतर मागासवर्गीय समाजाच्या आरक्षणाविषयी येत्या २ आठवड्यांत अंतरिम अहवाल सादर करावा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य मागासवर्गीय आयोगाला दिला आहे. १९ जानेवारी या दिवशी ही सुनावणी झाली.

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील इतर मागासवर्गीय समाजाचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रहित केल्यामुळे राज्य सरकारने प्रविष्ट केलेली पुनर्विचार याचिका आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने प्रविष्ट केलेली हस्तक्षेप याचिका यांवर न्यायालयाने हा निर्णय दिला.