रणांगण किंवा संघर्ष जिंकणार्‍यांसाठी गीता !

प.पू. स्वामी वरदानंद भारती

गीता ही मुळातच ज्याला रणांगण जिंकावयाचे आहे, त्याच्यासाठी सांगितली आहे. जीवनातून निवृत्त झालेल्या वृद्धांसाठी ती सांगितलेली नाही. जो तरुण आहे, ज्याच्यापुढे त्याचे संपूर्ण भावी जीवन उभे आहे, जे स्वभावतःच संघर्षमय आहे त्यासाठी लढावे लागणार आहे, अशा तरुणाच्या पाठीचा कणा ताठ बळकट असावयास हवा, हृदयात धैर्य हवे, मनगटात बळ हवे, बुद्धी स्थिर हवी, भूतकाळाची स्मृती हवी, भविष्याचा वेध घेणारी दृष्टी हवी, कोणत्या वेळी कुठे कसे वागावे, याचा नेमका निर्णय घेण्याचा विवेक हवा. असे असेल, तरच अभ्युदय, म्हणजे इहलोकीचे कल्याण साधता येते. यादृष्टीनेही गीता हे अत्यंत उपयोगी पडणारे शास्त्र आहे.

– प.पू. स्वामी वरदानंद भारती

(साभार : ग्रंथ ‘जीवनसाधना गीते’च्या १८ व्या अध्यायावरील भाष्य)