
‘बरेच लोक समाधानाच्या नावाखाली स्वतःची अकार्यक्षमता लपवतात, तर बरेच लोक प्रयत्न न करणे, म्हणजेच समाधान मानतात. समाधान म्हणजे प्रयत्न न करणे नव्हे, तर प्रयत्न केल्यानंतर जे काही मिळते त्यात आनंदी रहाणे होय. पुरुषार्थ करतांना नेहमीच असमाधानी रहा, प्रयत्नांच्या शेवटच्या मर्यादेपर्यंत जा, अकार्यक्षमतेपासून स्वतःचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करा. आपले ध्येय एका क्षणासाठीही विसरू नका. ‘तुम्ही काय आहात’, याविषयी बोलू नका; कारण तुमचे यश हीच तुमची इतरांशी ओळख असावी. कोणतेही काम करतांना ‘सर्वकाही माझ्यावर अवलंबून आहे’, या भावनेने कार्य करा आणि कृती केल्यानंतर मात्र ‘सर्वकाही भगवंतावर अवलंबून आहे’, या भावनेने शरण जा. परिणामी तुम्हाला जे मिळेल ते प्रेमाने स्वीकारा. कामात सावधगिरी बाळगणे आणि आनंदी असणे, हेच आनंदी जीवनाचे रहस्य आहे.’
– कु. विशाखा विनोद पेडणेकर, राजापूर, जिल्हा रत्नागिरी. (१०.७.२०२६)
गुरुपौर्णिमेला १६ दिवस शिल्लक
भारतियांचे राष्ट्रीय महापातक !
गुरुपौर्णिमेला १७ दिवस शिल्लक
काँग्रेसवाले आणि गोहत्येचे समर्थन करणारे यांना याविषयी काय म्हणायचे ?
संघटित होऊन कार्य करण्याचे रहस्य !
सनातनची सर्वांगस्पर्शी आणि चैतन्यमय ग्रंथसंपदा !