‘रायरेश्वर-हिंदवी स्वराज्य शपथभूमी’ या विशेष टपाल पाकिटाचे प्रकाशन !

‘रायरेश्वर-हिंदवी स्वराज्य शपथभूमी’ विशेष टपाल पाकिट

भोर (जिल्हा पुणे) – पुण्यातील ‘बायोस्फियर्स संस्थे’च्या पुढाकाराने भारतीय टपाल खात्याने ‘रायरेश्वर-हिंदवी स्वराज्याची शपथभूमी’ या विशेष टपाल पाकिटाचे प्रकाशन टपाल खात्याच्या पुणे विभागाच्या संचालिका सिमरन कौर यांच्या हस्ते केले.

(सौजन्य : Swarajy News Network)

रायरेश्वराचा इतिहास ‘हिंदवी स्वराज्य शपथभूमी रायरेश्वर’ या विशेष टपाल पाकिटाने जगभरात पोचणार असल्याचे मत ‘बायोस्फियर्स’चे अध्यक्ष डॉ. सचिन पुणेकर यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाला बायोस्फियर्स संस्था, रायरी ग्रामपंचायत, सह्याद्री सर्च अँड रेस्क्यू फोर्स, आम्ही बोरकर प्रतिष्ठान, स्वराज्य भूमी प्रतिष्ठान आणि सरदार हैबतराव शिळीमकर प्रतिष्ठान आदींचे प्रतिनिधी उपस्थित होते.