श्रीरंगपट्टण(कर्नाटक) येथील जामिया मशीद ही हनुमान मंदिर पाडून बांधल्याने मशीद पाडून पुन्हा मंदिर बांधण्याचे केले होते आवाहन !
|
श्रीरंगपट्टण (कर्नाटक) – येथील जामिया मशीद पाडून तेथे पुन्हा श्री हनुमान मंदिर बांधण्याचे आवाहन केल्याच्या प्रकरणी चिक्कमगळुरू येथील काली मठाचे प्रमुख ऋषि कुमार स्वामीजी यांना १८ जानेवारी या दिवशी अटक करण्यात आली आहे. ऋषि कुमार स्वामीजी यांचा एक व्हिडिओ सर्वत्र प्रसारित झाला आहे. त्यात ते या मशिदीच्या समोर उभे आहेत. ते म्हणत आहेत, ‘या जामीया मशिदीच्या ठिकाणी पूर्वी श्री हनुमान मंदिर होते, त्यामुळे अयोध्येत बाबरी पाडली, तशी ही मशीद लवकर पाडून येथे पुन्हा मंदिर बांधले पाहिजे. या मशिदीचे खांब आणि भिंती हिंदु वास्तूकलेप्रमाणे आहेत. हिंदूंना आणि त्यांच्या संघटनांनी या प्रकरणी एकत्र पुढे आले पाहिजे.’ हा व्हिडिओ पाहून पोलिसांनी त्यांना अटक केली. हा व्हिडिओ फेसबूकर प्रसारित करण्यात अला होता.
मस्जिद गिराने का ऐलान करने वाला गिरफ्तार, वीडियो बनाकर की थी अपील… #KarnatkaNews #RishikumarSwamijihttps://t.co/NB6fjjGmTG
— India TV Hindi (@IndiaTVHindi) January 19, 2022
१. ऋषि कुमार स्वामीजी यांना अटक करून स्थानिक न्यायालयात उपस्थित केल्यानंतरही ते त्यांच्या म्हणण्यावर ठाम असल्याचे त्यांनी सांगितले. ऋषि कुमार स्वामीजी यांच्या अधिवक्त्यांनी न्यायालयाला सांगितले की, ऋषि कुमार स्वामीजी यांचे विधान चुकीचे नाही. मशिदीमध्ये हिंदूंचे चिन्ह पाहून त्यांनी त्यांचे दुःख व्यक्त केले.
२. या वेळी सरकारी अधिवक्त्यांनी ऋषि कुमार स्वामीजी यांच्या जामिनाला विरोध केला; कारण यामुळे समाजात वैमनस्य निर्माण होऊ शकते, तसेच पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. यानंतर न्यायालयाने यावरील निकाल राखून ठेवल.