शामाप्रसाद मुखर्जी यांच्या हत्येचे षड्यंत्र !

शामाप्रसाद मुखर्जी

शामाप्रसाद मुखर्जी यांना ‘पेनिसिलीन’ची ‘रिॲक्शन’ होती. त्यांना ‘प्ल्यूरसी’ (फुप्फुसांच्या बाजूने असणार्‍या पेशींचा दाह होऊन सूज येणे) झाली होती. त्यासाठी त्यांना ‘स्ट्रेप्टोमायसिन’ची इंजक्शने चालू होती. त्यांचे उपचार करणार्‍या डॉ. महमूद याने एके दिवशी त्यात ‘पेनिसिलीन’ असणारे (‘ड्यूमेक्स’चे ‘स्ट्रेप्टोपेनिसिलीन’) इंजेक्शन दिले. पुढचा इतिहास प्रसिद्ध आहे. या सार्‍या गडबडीत शामाप्रसादांची नोंदवही अब्दुल्ल्याने गायब केली. त्यात पूर्ण लेखी पुरावा होता. तोच नष्ट झाल्यावर प्रकरण बंद करण्यात आले. त्यामुळे त्याची विचारपूस इत्यादी प्रकार घडू शकला नाही. सुदैवाने मला शामाप्रसादजी यांच्या आई जोगमायादेवी आणि नेहरू यांच्यातील पत्रव्यवहार पहायला मिळाला होता. त्यांच्या आईने नेहरूंना किती शिव्याशाप द्यावेत ?

– दादुमिया (संदर्भ : ‘धर्मभास्कर’, एप्रिल २०१५)