सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापिठाच्या संस्कृत-प्राकृत भाषा विभागाने घड्याळातील काळवाचक संख्यांच्या ठिकाणी संख्यावाचक संस्कृत शब्द देऊन एक घड्याळ बनवले आहे. हे सध्या सामाजिक संकेतस्थळावर प्रसारित होत आहे. (व्हायरल होत आहे.) या घड्याळातील संख्यावाचक संस्कृत शब्द आणि त्यांचे विश्लेषण येथे दिले आहे.