ईरोड (तमिळनाडू) येथील श्री ज्वरहरेश्वर मंदिरात महर्षींच्या आज्ञेने साधकांच्या आरोग्यासाठी मंगलमय वातावरणात करण्यात आली पूजा !

‘ईरोड (तमिळनाडू) येथील श्री ज्वरहरेश्वर मंदिरात महर्षींनी पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून दिलेल्या आज्ञेने साधकांच्या आरोग्यासाठी १०.३.२०२० या दिवशी मंगलमय वातावरणात अभिषेक आणि पूजा करण्यात आली. या वेळी पू. डॉ. ॐ उलगनाथन् आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची वंदनीय उपस्थिती लाभली. ही पूजा श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे जन्मनक्षत्र उत्तराफाल्गुनी, जन्मवार मंगळवार आणि कन्या रास असतांना यमगंड काळात करण्यात आली.

श्री ज्वरहरेश्वराला साधकांच्या आरोग्य रक्षणासाठी प्रार्थना करतांना श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ

सध्या जगभरात विविध संसर्गांच्या माध्यमातून अनेक जण रुग्णाईत होत आहेत. असे असतांना ‘सनातनच्या साधकांना कोणत्याही ज्वराने ग्रासून भय वाटू नये’, यासाठीश्री ज्वरहरेश्वराची पूजा करण्यात आली. या वेळी अधिकाधिक फळांच्या रसाचा अभिषेक करण्यात आला.

या पूजेविषयी महर्षींनी पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून सांगितले, ‘‘श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदाताई यांच्या नावाने, त्यांचे जन्मनक्षत्र आणि जन्मवार असलेल्या दिवशी श्री ज्वरहरेश्वराला अभिषेक केल्याने सर्व साधकांसाठी वेगळी पूजा करण्याची आवश्यकता नाही.’’

भवानी, ईरोड येथील श्री ज्वरहरेश्वर देवतेची मूर्ती

१. श्री ज्वरहरेश्वर मंदिराची माहिती

श्री ज्वरहरेश्वराचे मंदिर ईरोडमधील भवानी गावामध्ये संगमेश्वर मंदिरामध्ये आहे. भवानी गावामध्ये कावेरी, भवानी आणि अमृतावाहिनी (गुप्तनदी) या३ नद्यांचा संगम आहे. या संगमाच्या ठिकाणी संगमेश्वराचे शिव मंदिर आहे. या मंदिरात शिव आणि पार्वती या दोन्ही देवतांच्या मंदिराच्या मध्यभागी श्री ज्वरहरेश्वराचे मंदिर आहे. श्री ज्वरहरेश्वर देवतेला ३ मुख, ३ हात आणि ३ पाय असून ही देवता शिवाचे एक रूप आहे.

२. क्षणचित्रे

अ. श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ प्रार्थना करत असतांनाश्री ज्वरहरेश्वर देवाला वाहिलेली फुले खाली पडली.

आ. पूजा पूर्ण झाल्यावर कावेरी नदीचे पाणी कुंभामध्ये घेऊन अनेक महिला मंदिरात आल्या. या वेळी पू. डॉ. ॐ उलगनाथन् म्हणाले, ‘‘हा शुभसंकेत आहे.’’

– श्री. विनायक शानभाग, ईरोड, तमिळनाडू. (११.३.२०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक