‘केशकर्तनकार जावेद हबीब एका कार्यशाळेत केशरचनेचे प्रात्यक्षिक दाखवतांना ते पूजा गुप्ता या हिंदु महिलेच्या केसांमध्ये थुंकल्याची बातमी वृत्तपत्रामध्ये वाचनात आली. त्यानंतर आमच्या व्हॉटस्ॲपवर या बातमीचा व्हिडीओ प्राप्त झाल्यावर आम्ही तो पाहिला. तेव्हा लक्षात आलेले सूत्र खाली देत आहे.
या व्हिडीओत असे दाखवले आहे की, जावेद हबीब पूजा गुप्ता यांच्या केसांमध्ये थुंकले. हे सर्व काही महिलांसमोर घडले असून त्या प्रात्यक्षिक बघायला बसलेल्या महिलांनी त्यावर काहीच आक्षेप घेतला नाही; उलट हसून टाळ्या वाजवून त्याला प्रतिसाद दिला. तसेच पूजा गुप्ता यांनाही काहीच त्याचे वाटले नाही. तिला जाणवूनही तिने काहीच प्रतिकार केला नाही किंवा त्याविषयी नकार दर्शवला नाही. हा व्हिडीओ बघून असे वाटले की, धर्मांध आपल्या हिंदु महिलांना अपमानित करायची एकही संधी सोडत नाही आणि आपल्या महिलांना त्याविषयी काहीच वाटत नाही, म्हणजे आपल्या हिंदूंना धर्मशिक्षणाची किती आवश्यकता आहे, हे यावरून लक्षात येते. जर पालकांमध्येच आपल्या धर्माविषयी अभिमान नाही, तर त्या आपल्या पाल्यांना काय धर्माभिमान शिकवणार ? ‘आडातच नाही, तर पोहोर्यात कुठून येणार ?’ म्हणून आधी पालकांना धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे.
खरंच परात्पर गुरु डॉ. आठवले सांगतात त्याप्रमाणे धर्मशिक्षण देण्यासाठी हिंदु राष्ट्राविना काहीच पर्याय नाही.’
– सौ. अनुपमा जोशी (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के) आणि सौ. देवी कापडिया (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी आश्रम, फोंडा, गोवा. (११.१.२०२२)