सर्दी खोकल्यावर उपयुक्त असलेली होमिओपॅथी आणि बाराक्षार औषधे

‘हिवाळ्यामध्ये सर्वसाधारणपणे सर्दी आणि खोकला बहुतेकांना होतो. त्यासाठी लक्षणांनुसार उपयुक्त असलेली होमिओपॅथी आणि बाराक्षार औषधे यांची सूची येथे दिली आहे.

१. सर्दीसाठी (Allergic Rhinitis) उपयुक्त होमिओपॅथी औषधे

१ अ. लक्षणे : सर्दीच्या प्राथमिक स्थितीमध्ये

१ अ १. औषध : ‘ॲकोनाईट’ ३०

१ आ. लक्षणे : ‘नाकातून पुष्कळ प्रमाणात जळजळणारा असा स्राव वहाणे, डोळ्यांतून थंड पाणी येणे, सतत शिंका येणे, तसेच उबदार खोलीमध्ये त्रासात वाढ होणे, तर मोकळ्या हवेमध्ये बरे वाटणे.

१ आ १. औषध : ‘एलियम सेपा’ ३० किंवा २००

१ इ. लक्षणे : नाकातून थंड स्राव वहाणे, डोळ्यांतून जळजळणारे पाणी येणे, रात्री पडून राहिले असता बरे वाटणे, तसेच दिवसा (मोकळा) खोकला येणे.

१ इ १. औषध : ‘युफ्रेशिया’ ६ किंवा ३०

१ ई. लक्षणे : हिवाळ्यामध्ये आणि मोकळ्या हवेमध्ये त्रास वाढणे. पाण्यासारखा पातळ अन् जळजळणारा स्राव नाकातून वहाणे आणि त्या बरोबर थोड्या प्रमाणात (मंद) डोके दुखणे, तसेच सतत थोड्या थोड्या वेळाने थोडे थोडे पाणी पिणे.

होमिओपॅथी वैद्य प्रवीण मेहता

१ ई १. औषध : ‘अर्सेनिक आल्ब’ ३० किंवा २००

१ उ. लक्षणे : थंड आणि दमट हवेमध्ये गेल्याने सर्दी होणे, रात्री आणि मोकळ्या हवेमध्ये नाक बंद होणे, दिवसा आणि उबदार खोलीमध्ये नाक वहाणे, अतिशय थंडी वाजणे, तसेच जीभ स्वच्छ असणे.

१ उ १. औषध : ‘नक्सव्हॉमिका’ ३० किंवा २००

१ ऊ. लक्षणे : थंड हवेमध्ये गेल्याने सर्दी होणे, ताप येणे; परंतु तहान नसणे, अतिशय थकवा, झोपून रहावेसे वाटणे, नाकातून जळजळणारा स्राव येणे, डोके जड होणे, जिभेवर पिवळा थर असणे, रात्री त्रासामध्ये वाढ होणे.

१ ऊ १. औषध : ‘जल्सेमियम’ ३० किंवा २००

१ ए. लक्षणे : नाकातून घट्ट पिवळा स्राव येणे, वास आणि चव नसणे, तहान नसणे, भूक अल्प होणे, जीभेवर जाडसर पांढरा थर येणे.

१ ए १. औषध : ‘पल्सेटिला’ ३०.

१ ऐ. लक्षणे : थंडी सहन न होणे, दारे खिडक्या बंद करून शेकोटीजवळ बसणे, थंडीमध्ये लक्षणांत वाढ होणे.

१ ऐ १. औषध : ‘हेपार सल्फ’ ३० किंवा २००

१ ओ. लक्षणे : पावसामध्ये भिजल्याने सर्दी होणे

१ ओ १. औषध : ‘र्‍हसटॉक्स’ २००

२. बाराक्षार औषधे

होमिओपॅथीप्रमाणेच हीसुद्धा एक औषधोपचार पद्धत आहे. होमिओपॅथीमध्ये ४ सहस्र औषधे आहेत, तर बाराक्षारमध्ये केवळ १२ च औषधे आहेत.

२ अ. लक्षणे : प्रथमावस्था. कोरडी सर्दी, नाक चोंदलेले, अंगदुखी, थोडा ताप असणे आणि सर्दीसह खोकला असणे.

२ अ १. औषध : ‘फेरम फॉस’

२ आ. लक्षणे : ‘फेरम फॉस’ नंतर ‘काली मूर’ हे उपयुक्त औषध आहे. सर्दी पिकलेली, स्राव पांढरा, चिकट आणि नाक गच्च झालेले असणे, स्राव झोंबणारा असून पूमिश्रित, घट्ट आणि चिकट असणे, जीभ पांढरी किंवा राखी रंगाची होणे आणि भूक न लागणे.

२ आ १. औषध : ‘काली मूर’

२ इ. लक्षणे : सकाळी थंड हवेमध्ये शिंका येणे. मोकळ्या हवेमध्ये सर्दी आणि शिंका यांमध्ये वाढ होणे, नाकाचा शेंडा आणि तळहात गार असणे, स्रावाला दुर्गंधी येणे आणि नाकामध्ये वेदना होणे.

२ इ १. औषध : ‘कल्केरिया फॉस’

२ ई. लक्षणे : नाकाचे हाड वाढल्यामुळे होणारे सर्दी पडसे. नाक चोंदलेले किंवा कोरडी सर्दी असणे, स्राव हिरवट आणि घट्ट, ‘शिंका येतील’, असा भास होणे; परंतु प्रत्यक्षात एकही शिंक न येणे, थंड हवेमध्ये त्रास वाढणे.

२ ई १. औषध : ‘कल्केरिया फ्लोर’

२ उ. लक्षणे : नाकातून जाड पिवळा स्राव वहाणे, स्राव झोंबणारा, पूमिश्रित आणि घट्ट असणे, पुष्कळ शिंका येणे, स्रावाला वास नसणे (‘सिलिशिया’ – स्रावाला वास असतो.) मोकळ्या हवेमध्ये सर्दी मोकळी होणे. (‘सिलिशिया’- मोकळ्या हवेमध्ये त्रास वाढतो.)

२ उ १. औषध : ‘कल्केरिया सल्फ’

२ ऊ. लक्षणे : नाकातून जाड पिवळा किंवा हिरवट पिवळा स्राव वहातो. स्राव आणि श्वासोच्छ्वास यांना दुर्गंधी येते. मध्यरात्री पुष्कळ जोराच्या शिंका येतात. रात्री नाक चोंदते.

२ ऊ १. औषध : ‘काली फॉस’

२ ए. लक्षणे : नाकातील स्राव पातळ, पिवळा, चिकट, झोंबणारा आणि दुर्गंधीयुक्त असणे, उबदार जागेमध्ये, बंद खोलीमध्ये अथवा सायंकाळी नाक चोंदणे, मोकळ्या हवेमध्ये गेल्याने स्राव मोकळे होणे, नाकपुडीच्या डाव्या बाजूला होणारी सर्दी असणे.

२ ए १. औषध : काली सल्फ ‘६X’ पोटन्सी (पॉवर असलेली) प्रति ३ घंट्यांनी घेणे. (६X म्हणजे ६X इतकी पॉवर असलेली. ही शक्ती १X , २X …. अशा क्रमाने मोजली जाते. – संकलक)

२ ऐ. लक्षणे : स्राव पाण्यासारखा पातळ, पारदर्शक आणि खारट असणे, नाक आणि डोळे यांतून सतत गळ लागलेली (पाणी गळत) असणे, स्राव पुष्कळ आणि झोंबणारा असून शिंका सकाळी येणे, बाहेरून घरी आल्यानंतर शिंका चालू होणे, सर्दीमुळे वास न येणे, सर्दीसह खोकला असणे, जिभेला चव नसणे.

२ ऐ १. औषध : ‘नेट्रम मूर’

२ ओ. लक्षणे : हा पावसाळ्यामध्ये किंवा दलदलीच्या जागेमध्ये होणारा सर्दीचा त्रास असून नाकातून येणारा स्राव हा हिरवट किंवा हिरवट-पिवळसर असणे

२ ओ १. औषध : ‘नेट्रम सल्फ’

२ औ. लक्षणे : नाकपुड्या कधी ओलसर, तर कधी कोरड्या असणे, वास न येणे.

२ औ १. औषध : ‘मॅग फॉस’

२ अं. लक्षणे : जुनी सर्दी. श्वासाला दुर्गंधी असणे, स्राव जाड आणि पिवळा असणे, पुष्कळ शिंका येणे, नाकामध्ये कोरड पडणे, सकाळी नाक चोंदणे आणि दिवसा वहाणे, नाकामध्ये वेदना होणे, वास न येणे, डोक्याला घाम येणे.

२ अं १. औषध : ‘सिलिशिया’

३. होमिओपॅथी आणि बाराक्षार या दोन्हींकरता पथ्य

कापूर आणि अत्तर यांपासून ही औषधे दूर ठेवणे आणि कांदा, लसूण अन् कॉफी वर्ज्य करणे.’

(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ ‘होमिओपॅथी उपचार’)

संकलक : होमिओपॅथी वैद्य प्रवीण मेहता, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१५.११.२०१९)

होमिओपॅथी औषधांच्या ‘पोटन्सी’विषयी माहिती

१. पोटन्सी शब्दाचा अर्थ

‘पोटन्सी’ या शब्दाचा अर्थ ‘शक्ती’ असा आहे. घनावस्थेतील औषधाचा ‘दुधाच्या साखरे’सह (टीप) खल केल्याने, तसेच प्रवाही (द्रव) औषधे अल्कोहोलसह बाटलीमध्ये जोराने हलवल्याने त्या औषधांची शक्ती वाढते. तिला ‘पोटन्सी’ असे म्हणतात.
टीप – दुधाची साखर (शुगर ऑफ मिल्क) : दुधापासून विशिष्ट पद्धतीने बनवलेली साखर. हिचा उपयोग घन औषधांची शक्ती वाढवण्यासाठी केला जातो.

२. पोटन्सीचे प्रकार

प्रवाही औषधांच्या ज्या पोटन्सी सिद्ध होतात, त्यांना ‘डायल्यूशन्स’ असे म्हणतात. घनावस्थेतील औषधांच्या ज्या पोटन्सी सिद्ध होतात, त्यांना ‘ट्रायच्युरेशन्स’ किंवा ‘अटेन्युएशन्स’ असे म्हणतात. ‘डायल्यूशन्स’ ही अल्कोहोलसह केली जातात, तर ‘ट्रायच्युरेशन्स’ ही दुधाच्या साखरेसह केली जातात.

२ अ. सेंटीसिमल पोटन्सी : मूळ औषधाचा एक भाग आणि अल्कोहोल अथवा दुधाच्या साखरेचे ९९ भाग हे प्रमाण घेऊन सिद्ध करण्यात येणार्‍या पोटेन्सींना ‘सेंटीसिमल पोटन्सी’ असे म्हणतात.

होमिओपॅथीचे निर्माते डॉ. हानेमान हे प्रमाण घेऊन औषधे सिद्ध करत असत. औषधाच्या नावापुढे ‘सी’(C) हे अक्षर लिहिलेले असेल किंवा कोणतेही अक्षर लिहिलेले नसेल, तर ते औषध ‘सेंटीसिमल पोटन्सी’चे आहे, असे समजावे, उदा. बेलाडोना ३०C. ‘सेंटीसिमल पोटन्सी’ला ‘सी’(C) हे अक्षर नाही लिहिले, तरी चालते; पण ‘डेसिमल पोटन्सी’ला ‘X’ किंवा ‘D’ यांपैकी एखादे अक्षर लिहावेच लागते. ‘एकाच प्रकारची पोटन्सी २ वेगवेगळ्या प्रकारे लिहिणे’, हे होमिओपॅथीच्या जागतिक नियमांनुसार आहे.

२ आ. डेसिमल पोटन्सी : मूळ औषधाचा एक भाग आणि अल्कोहोल अथवा दुधाच्या साखरेचे ९ भाग हे प्रमाण ठेवून सिद्ध करण्यात येणार्‍या पोटेन्सींना ‘डेसिमल पोटन्सी’ असे म्हणतात. डॉ. हेरिंग यांनी ही पद्धत चालू केली. औषधाच्या नावापुढे ‘डी’ (D) हे अक्षर लिहिलेले असेल किंवा ‘X’ अशी खूण असेल, तर ते औषध ‘डेसिमल पोटन्सी’चे आहे, असे समजावे, उदा. बेलाडोना ३०X किंवा बेलाडोना ३०D

२ इ. प्रवाही पोटन्सी

१. औषधाच्या मूळ अर्काचा १ भाग घेऊन त्यामध्ये ९ भाग अल्कोहोल घालून त्या मिश्रणाला एका बाटलीमध्ये १० वेळा विशिष्ट पद्धतीने धक्के दिल्यावर त्या मूळ औषधामध्ये जी शक्ती निर्माण होते, तिला ‘१ (पहिली) पोटन्सी’ असे म्हणतात.

२. या १ (पहिल्या) पोटन्सीचा १ भाग घेऊन त्यामध्ये ९ भाग अल्कोहोल घालून त्या मिश्रणाला एका बाटलीमध्ये १० वेळा विशिष्ट पद्धतीने धक्के (Succession) दिल्यावर त्या औषधाच्या वाढलेल्या शक्तीला ‘२ (दुसरी) पोटन्सी’ असे म्हणतात. असेच पुनः पुन्हा करून पुढची पुढची पोटन्सी सिद्ध करतात. अशा पद्धतीने ३०, २००, १M (१ सहस्र), १०M (१० सहस्र), CM (१ लक्ष) या पोटन्सी सिद्ध केल्या जातात.

३. प्रवाही पोटन्सी सिद्ध करतांना बाटलीमध्ये मूळ अर्क आणि अल्कोहोल घातल्यावर बाटलीतील ३/४ जागा रिकामी ठेवावी लागते. त्यानंतर बाटलीला घट्ट बूच लावून ते अंगठ्याने दाबून धरून बाटली विशिष्ट पद्धतीने आपटून बाटलीला धक्के दिले जातात.

२ ई. घन पोटन्सी

१. घन अवस्थेमधील औषधाच्या मूळ चूर्णाचा १ भाग आणि ९ भाग दुधाची साखर घेऊन त्याचा १ घंटा विशिष्ट पद्धतीने एकसारखा खल केल्यावर ‘१X (पहिली) पोटन्सी’ सिद्ध होते. ‘खल करणे’, म्हणजे ‘औषध आणि दुधाची साखर चिनी मातीच्या खलात घालून
बत्त्याने घोटणे’.

२. या पहिल्या पोटन्सीच्या औषधाचा १ भाग घेऊन त्यामध्ये ९ भाग दुधाची साखर घालून १ घंटा विशिष्ट पद्धतीने एकसारखा खल केल्यावर ‘२X (दुसरी) पोटन्सी’ सिद्ध होते. अशा पद्धतीने ३X, ६X, १२X यांसारख्या पोटन्सी सिद्ध केल्या जातात.

३. खल करत असतांना खलात सर्व साखर एकदम न घालता त्या साखरेचे ४ भाग करावेत. त्यांपैकी १ भाग खलात घालून प्रथम १५ मिनिटे खल करावा. नंतर दुसरा भाग घालून पुन्हा १५ मिनिटे खल करावा. त्यानंतर राहिलेले २ भाग घालून अर्धा घंटा खल करावा. खल एकसारखा (समान) जोर देऊन आणि हळूहळू करावा.

(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ ‘होमिओपॅथी उपचार’)

संकलक : होमिओपॅथी वैद्य प्रवीण मेहता, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१५.११.२०१९)