शिर्डी साई संस्थानकडून आरोग्य साधनांसाठी देणगी देण्याचे भाविकांना आवाहन !

अन्य धर्मियांच्या धार्मिक स्थळांकडून असे आवाहन केलेले कधी वाचनात येत नाही, हे लक्षात घ्या !

नगर – कोरोनाबाधित रुग्‍णांकरता व्‍हेंटिलेटर, लिक्विड ऑक्सिजन प्‍लांट आणि ड्युरा सिलेंडर, तसेच इतर वैद्यकीय साहित्‍यांची आवश्यकता असून याकरता देणगी देऊ इच्छिणार्‍या साईभक्‍तांनी संस्‍थानच्‍या ‘श्री साईबाबा हॉस्पिटल आणि जनसंपर्क कार्यालय’ यांच्‍याशी संपर्क करावा, असे आवाहन संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत यांनी केले आहे.

नुकतेच नाशिक विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना विषाणूच्या संभाव्‍य लाटेच्‍या पार्श्वभूमीवर करावयाच्‍या उपाययोजनांसाठी आढावा बैठक शिर्डीत घेण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर साई आश्रम, फेज २, साई धर्मशाळा येथे संभाव्‍य तिसर्‍या लाटेसाठी कोविड रुग्णालय उभारणीचे काम चालू असून या कामी आवश्यक असलेल्या वैद्यकीय साहित्‍यांसाठी संस्थानकडून वरील आवाहन करण्यात आले आहे.