‘४.६.२०२० या दिवशी भाववृद्धी होण्यासाठी घेण्यात आलेल्या सत्संगामध्ये ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांना सर्व फुलांमध्ये साधकफूल अधिक प्रिय असणे’, हा विषय घेण्यात आला होता. त्या वेळी ‘फुलांमधील शरणागतभाव, त्याच्यातील निरागसता आणि निर्मळता हे गुण साधकामध्ये यायला पाहिजेत’, हे लक्षात आले. तसेच जेव्हा परिस्थिती स्वीकारू न शकल्याने मनाचा संघर्ष होतो, त्या वेळी फुलांतील गुण आठवल्यावर मन सकारात्मक होते आणि परिस्थिती स्वीकारणे सहज शक्य होते, हेही लक्षात आले. साधकाचे आणि फुलाचे ध्येय याविषयी लक्षात आलेली सूत्रे येथे दिली आहेत.
‘फुलांमधील हे सर्व गुण साधकांमध्ये येवोत’, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.’
– श्री. विवेक नाफडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१०.६.२०२०)