मुंबई – भाजपचे आमदार आशिष शेलार आणि त्यांचे कुटुंबीय यांना ठार मारण्याची धमकी देणार्या धर्मांधाला वांद्रे येथील गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी ८ जानेवारी या दिवशी अटक कली आहे. धमकी देणार्याचे नाव ओसामा समशेर खान असून तो माहीम कॉजवे येथे रहाणारा आहे. दोन दिवसांपूर्वी आशिष शेलार यांच्या भ्रमणभाषवर त्यांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता.