उच्च न्यायालयाची भाषा इंग्रजी असल्याने केवळ इंग्रजी भाषेतच बोला ! – गुजरात उच्च न्यायालय

  • न्यायाधीश आणि अधिवक्ता यांची इंग्रजकालीन वेशभूषा, इंग्रजांप्रमाणे न्यायाधिशांना ‘माय लॉर्ड’ (स्वामी) असे आदरार्थी संबोधणे आदींचा वापर करण्याविषयी काही न्यायाधिशांनीच विरोध दर्शवला होता. त्यामुळे ‘न्यायालयांचे कामकाज स्थानिक भाषेत चालावे’, अशी राष्ट्रप्रेमींनी आग्रही भूमिका मांडल्यास आश्‍चर्य ते काय ? – संपादक
  • स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांत भारतातील न्यायालयाची भाषा अद्यापही इंग्रजांची गुलामगिरी करणार्‍या इंग्रजीत असणे, ही स्थिती आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद ! – संपादक
गुजरात उच्च न्यायालय

कर्णावती (गुजरात) – उच्च न्यायालयाची भाषा इंग्रजी आहे. तुम्ही केवळ इंग्रजी भाषेत बोलले पाहिजे, असे गुजरात उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांनी एका याचिकेवर सुनावणीच्या वेळी म्हटले. पक्षकारांकडून हिंदी आणि गुजराती भाषेचा वापर केला जात असल्याने त्यांनी वरील विधान केले. या वेळी न्यायाधिशांनी ‘आवश्यक असल्यास दुभाषी किंवा अधिवक्ता देऊ शकतो’, असेही सांगितले. स्थानिक वृत्तपत्र ‘सामना भ्रष्टाचार का’ आणि त्याचे संपादक विशाल चंद्रकांत व्यास यांच्या विरोधात अवमान याचिकेवर सुनावणी चालू असतांना न्यायालयाने वरील विधान केले. न्यायाधिशांनी इंग्रजीमध्ये बोलण्यास सांगितल्यानंतरही व्यास गुजराती आणि हिंदी या भाषांमध्येच बोलत राहिले. त्यांनी सांगितले की, ते केवळ गुजरातीच बोलू शकतात.