हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘अन्न आणि औषध प्रशासना’कडे निवेदनाद्वारे मागणी
अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वतःहून आदेश का काढत नाही ?-संपादक
सातारा, २९ डिसेंबर (वार्ता.) – खाद्यपदार्थ वर्तमानपत्रात बांधून देणे हे नागरिकांच्या आरोग्यासाठी हानीकारक आहे. वर्तमानपत्रासाठी वापरण्यात येणार्या शाईत ‘डाय आयसोब्युटाइल फटालेट’ आणि ‘डायइन आयसोब्युटाईल’ हे रसायन असल्याने गरम खाद्यपदार्थांच्या संपर्कात आल्यावर हे रसायन विरघळते अन् ते आरोग्यास अत्यंत घातक आहे. ही शाई पोटात गेल्यास पचनक्रियेत बिघाड होऊ शकतो, तसेच पोटाचे अनेक विकारही जडू शकतात. यामुळे ‘अन्न आणि औषध प्रशासना’च्या वतीने खाद्यपदार्थांच्या ‘पॅकिंग’साठी वर्तमानपत्राच्या कागदाचा उपयोग न करण्याविषयी तात्काळ आदेश निर्गमित करावेत, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
सातारा येथील सदरबझारस्थित कार्यालयामध्ये साहाय्यक आयुक्त अ.अ. भोईटे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी हिंदु महासभेचे श्री. उमेश गांधी, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री राजेंद्र सांभारे, सुनील लोंढे उपस्थित होते.
निवेदनामध्ये म्हटले आहे,
१. ‘अन्न सुरक्षा आणि मानके कायदा – २००६’ हा कायदा ५ ऑगस्ट २०११ या दिवसापासून देशात लागू करण्यात आला असून याचा उद्देश या कायद्याद्वारे जनतेस सुरक्षित, सकस, निर्भेळ अन्न उपलब्ध करून देणे हा आहे; मात्र यामुळे या आदेशाचे पालन होतांना दिसत नाही. भारतीय खाद्य सुरक्षा मानके प्राधिकरण (एफ्.एस्.एस्.ए.आय.) भारत सरकार यांनी ६ डिसेंबर २०१६ या दिवशी आदेश निर्गमित केले असून त्याचे सर्व अन्न व्यावसायिक, मोठी उपाहारगृहे, बेकरी व्यावसायिक, स्नॅक्स सेंटर, स्वीटमार्ट, भजी-वडापाव विक्रेते, भेळ विक्रेते यांनी त्याचे पालन करणे आवश्यक आहे; मात्र प्रत्यक्षात तसे होतांना दिसत नाही.
२. खाद्यपदार्थ वर्तमानपत्रात (न्यूज पेपरमध्ये) बांधून न देण्याविषयी पुणे येथील साहाय्यक आयुक्त अन्न आणि औषध प्रशासन यांच्याकडून आदेश काढण्यात आले आहेत. त्यामुळे हॉटेलचालक आणि दुकानदार यांनी असे गरम पदार्थ वर्तमानपत्रात बांधून दिल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
३. सातारा जिल्ह्यातही आपल्या विभागाकडून नागरिकांच्या आरोग्याचा विचार प्राधान्याने होऊन त्याविषयी योग्य ती प्रसिद्धी अन् प्रबोधन करण्यात यावे.
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२२ डिसेंबर । आता वर्तमानपत्राच्या कागदाचा वापर पुण्यात गरम खाद्यपदार्थ पॅकिंग करण्यासाठी करता येणार नाही. वर्तमानपत्र प्रिंट करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या शाईत केमिकल असल्यामुळे गरम खाद्यपदार्थांच्या संपर्कातhttps://t.co/MZkF4rypQ8 pic.twitter.com/sG7x0gLVCn
— Maharashtra24 (@Maharashtra241) December 22, 2021
याविषयी तात्काळ आदेश निर्गमित करून प्रसिद्धी अन् प्रबोधन करणार ! – अ.अ. भोईटेया वेळी सातारा येथील अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या साहाय्यक आयुक्त हिंदु जनजागृती समितीने मांडलेला विषय अत्यंत गंभीर असून याविषयी आमच्या विभागाकडून कठोर पावले उचलण्या येतील, तसेच याविषयी तात्काळ आदेश निर्गमित करून समाजात सर्वच स्तरावर प्रसिद्धी अन् प्रबोधन करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. |