भारतामध्ये समांतर अर्थव्यवस्था निर्माण करणारे ‘हलाल प्रमाणपत्र’ रहित करावे !

सोलापूर येथील ‘राजे ग्रुप’ आणि अन्य धर्मप्रेमी यांच्याकडून प्रशासनास निवेदन

तहसीलदार दत्तात्रय मोहोळ यांना निवेदन देतांना सोलापूरातील ‘राजे ग्रुप’चे धर्मप्रेमी

सोलापूर, २५ डिसेंबर (वार्ता.) – ‘भारतामध्ये समांतर अर्थव्यवस्था निर्माण करणारे ‘हलाल प्रमाणपत्र’ रहित करण्यात यावे’, या मागणीचे निवेदन सरवदेनगर येथील ‘राजे ग्रुप’चे धर्मप्रेमी आणि शहरातील अन्य धर्मप्रेमी यांनी दिले. हे निवेदन जिल्हाधिकार्‍यांच्या वतीने महसूल विभागाचे तहसीलदार दत्तात्रय मोहोळ यांनी स्वीकारले.

या वेळी ‘राजे ग्रुप’चे सर्वश्री समर्थ चव्हाण, सागर हुंडेकरी, सोमनाथ जमादार, सचिन माळगे, शांतलिंग पाटील, धनंजय बोकडे, माधव पुजारी आदी उपस्थित होते, तर शहरातील अन्य धर्मप्रेमी सर्वश्री संदीप ढगे, लिंगराज हुळ्ळे, देविदास वडलाकोंडा, शिंगरय्या मेर्गू, नागेश नारायणकर, सशांक बोलाबत्तीन, सागर कोडम यांनी प्रशासनाला निवेदन दिले.