पेण – महाराष्ट्र सेना निवृत्त प्रा. शिक्षक आणि कर्मचारी संघटना रायगड यांच्या वतीने सेवा निवृत्त शिक्षक श्री. चंद्रहास चांगदेव गावंड यांना ‘ब्रह्मर्षी’ पुरस्कार मिळाल्यासाठी अग्रिसेना समाज मंदिर पेण येथील सभेत सन्मानित करण्यात आले. मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीने गुरुजींचे कार्य पाहून त्यांना ‘ब्रह्मर्षी’ उपाधी देऊन सन्मानित केले.
गावंडगुरुजी वर्ष १९९८ पासून सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करत आहेत. त्यांनी ३१ वर्षे शिक्षक म्हणून सेवा केली आहे. आतापर्यंत त्यांनी विविध ठिकाणी कीर्तन, प्रवचने घेऊन समाजात प्रबोधन केले. त्यासाठी त्यांचे सत्कारही करण्यात आलेले आहेत.