नोएडा (उत्तरप्रदेश) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रशासनाला निवेदन सादर
नोएडा (उत्तरप्रदेश) – नववर्षाच्या नावाने राज्यातील पर्यटनस्थळे, ऐतिहासिक स्थळे आणि अन्य सार्वजनिक स्थळे या ठिकाणी होणार्या अपप्रकारांवर प्रतिबंध घालावा, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २० डिसेंबर या दिवशी येथील शहर दंडाधिकारी कार्यालयामध्ये निवेदन देण्यात आले. (अशी मागणी का करावी लागते ? – संपादक)
‘३१ डिसेंबरच्या रात्री मोठ्या प्रमाणात धूम्रपान, मद्यपान, अमली पदार्थांचे सेवन केले जाते. तसेच या दिवशी मुलींची छेड काढणे, बलात्कार आदी कुकृत्येही मोठ्या प्रमाणात होऊन कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने गंभीर स्थिती निर्माण होते. त्यामुळे अपप्रकार रोखण्यासाठी योग्य कार्यवाही करण्यात यावी’, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.