उत्तरप्रदेशमध्ये लव्ह जिहादविरोधी कायद्याद्वारे पहिली शिक्षा !

धर्मांध तरुणाला १० वर्षे कारावास आणि ३० सहस्र रुपये दंड

‘लव्ह जिहाद’ हे थोतांड आहे’, असे बेंबीच्या देठापासून ओरडणारे पुरो(अधो)गामी, धर्मनिरपेक्षतावादी, साम्यवादी आणि उदारमतवादी चमूला आता काय म्हणायचे आहे ? आता न्यायालयांचेही ‘भगवेकरण’ झाले आहे, असे या चमूने म्हटल्यास आश्‍चर्य वाटायला नको ! – संपादक

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशात लव्ह जिहादविरोधी कायदा बनवण्यात आल्यानंतर आता या कायद्यांतर्गत एका दोषी धर्मांधाला १० वर्षे कारावास आणि ३० सहस्र रुपये दंड, अशी शिक्षा करण्यात आली आहे. वर्ष २०१७ मध्ये जावेद याने त्याचे नाव ‘मुन्ना’ असल्याचे सांगत एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते. नंतर तिच्याशी विवाह करण्यासाठी त्याने तिला पळवून नेले होते. जावेद याने नंतर त्याची खरी ओळख उघड करून या मुलीशी मुसलमान पद्धतीने विवाह करण्याचे सांगितल्यावर तिने त्यास नकार दिला. पोलिसांनी या तरुणाला अटक केल्यावर त्याच्यावर मुलीच्या सांगण्यावरून बलात्काराचा गुन्हाही नोंदवण्यात आला. आतापर्यंत उत्तरप्रदेश पोलिसांनी लव्ह जिहादविरोधी कायद्याच्या अंतर्गत एकूण १०८ गुन्हे दाखल केले आहेत.