कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्रीदत्त पालखी सोहळा रहित !

अक्कलकोट, १७ डिसेंबर (वार्ता.) – वटवृक्ष स्वामी मंदिरात यंदा परंपरेनुसार १८ डिसेंबर या दिवशी श्रीदत्त जन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे; मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या सूचनेनुसार श्रीदत्त पालखी सोहळा रहित करण्यात आला आहे, अशी माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष तथा नगरसेवक महेश इंगळे यांनी दिली.
महेश इंगळे म्हणाले, ‘‘कोरोनाविषयी शासनाने घालून दिलेले नियम पाळून परंपरेनुसार मंदिर समितीच्या वतीने ज्योतीबा मंडपामध्ये धार्मिक कार्यक्रम आणि श्रीदत्त जन्मोत्सव अन् श्रीदत्त जयंती महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. १८ डिसेंबर या दिवशी दुपारी ४ ते सायं. ५.३० या वेळेत श्रीदत्त जन्म आख्यान वाचन आणि भजन होईल. सायंकाळी ६ वाजता श्रीदत्त जन्मोत्सव सोहळा, आरती आणि पाळणा होईल. १९ डिसेंबर या दिवशी सकाळी ११.३० वाजता नैवेद्य आरती आणि प्रसाद वाटप होईल. दुपारी १ ते ३ या वेळेत भक्तनिवास भोजनकक्षामध्ये महाप्रसाद देण्यात येईल.’’
टाकळी (सांगली) येथे वाढीव वर्गणी देऊनही भेडसावणार्या तीव्र पाणीटंचाईमुळे नागरिक त्रस्त !
कुडाळ येथील शासकीय भूमीतील अनधिकृत ‘फास्ट फूड स्टॉल’ अखेर हटवला
पुणे शहरातील रस्त्यांवर केवळ ५४ खड्डेच !
उसप गावातील प्रस्तावित दगड खाण आणि क्रशर प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध
पत्नीचा छळ करून तिची आक्षेपार्ह छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी
मोरजी येथे घर पाडण्याच्या कारवाईच्या वेळी रहिवाशाचा आत्महत्येचा प्रयत्न