जनरल नरवणे हे ‘चीफ ऑफ स्टाफ’ समितीचे अध्यक्ष

नव्या ‘सीडीएस्’ची (‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ची) म्हणजे तिन्ही सैन्यदलांच्या प्रमुखाची नियुक्ती होईपर्यंत केलेली पर्यायी व्यवस्था

सैन्यदलप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे

नवी देहली – भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस्) म्हणजे तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख जनरल बिपीन रावत यांचे हेलिकॉप्टरच्या अपघातात निधन झाल्यानंतर आता नव्या सीडीएस्ची नियुक्ती करण्यासाठीची प्रक्रिया प्रारंभ झाली आहे. नव्या सीडीएस्ची नियुक्ती होईपर्यंत देशामध्ये जुनी व्यवस्था तात्पुरती लागू करण्यात आली आहे. त्यानुसार सैन्यदलप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांना ‘चीफ ऑफ स्टाफ’ समितीचे अध्यक्ष नियुक्त करण्यात आले आहे. जनरल नरवणे सर्वांत ज्येष्ठ आहेत. त्यामुळे त्यांना या समितीचे प्रमुख नियुक्त करण्यात आले आहे. तसेच देशाचे नवे सीडीएस् म्हणूनसुद्धा जनरल नरवणे यांचेच नाव आघाडीवर असल्याचे सांगण्यात येत आहे. देशात सीडीएस्ची व्यवस्था नव्हती, तेव्हा देशामध्ये ‘चीफ ऑफ स्टाफ’ समिती तिन्ही सैन्यदलांमध्ये समन्वयाचे काम करत होती. या समितीमध्ये तिन्ही सैन्यदलांच्या प्रमुखांचा समावेश आहे.