बेरोजगारी आणि शेती किंवा व्यवसाय न करता ‘सरकारी नोकरीच हवी’, या प्रवृत्तीमुळे उद्भवलेली स्थिती !
पणजी, १५ डिसेंबर (वार्ता.) : गोवा मनुष्यबळ विकास महामंडळाने १०४ कामगार पदांसाठी भरती प्रक्रिया चालू केली आहे. या पदासाठी उमेदवार इयत्ता ६ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. पदावर नियुक्त झालेल्यांना प्रतिमास १२ सहस्र ५०० रुपये वेतन देण्यात येणार आहे. या पदासाठी १५ डिसेंबर या दिवशी सकाळी सत्तरी येथील कोपर्डे फार्म हाऊस येथे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. विशेष म्हणजे या मुलाखतीला पदवीधरांसह सहस्रो उमेदवारांनी उपस्थिती लावली. यामुळे राज्यातील बेरोजगारीची दाहक परिस्थिती समोर आली.