पुणे – ३५५ व्या आग्रा सुटका स्मृतीदिन प्रसंगाचे औचित्य साधून श्री शिवाजी राजगड स्मारक मंडळ, पुणे आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ११ आणि १२ डिसेंबर या दिवशी या कार्यक्रमाचे आयोजन स्वराज्याची पहिली राजधानी किल्ले राजगडावर करण्यात आले होते. कार्यक्रमाचे हे ४१ वे वर्ष होते. या कार्यक्रमास शिवसेनेचे रमेश कोंडे, अतुल दांगट, मंडळाचे कार्यकर्ते आणि असंख्य शिवप्रेमी उपस्थित होते.
पाली दरवाजा ते पद्मावती मंदिरापर्यंत ढोल ताश्याच्या गजरात भंडारा उधळत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पालखीची दिमाखात मिरवणूक काढण्यात आली. शिव व्याख्याते संदीप तापकीर यांचे व्याख्यान झाले. शिवशाहीर श्रीकांत रेणके, श्रीकांत शिर्के आदी कलाकारांनी पोवाडा साजरा केला.