अररिया (बिहार) येथील गावामध्ये गोवंश चोरणार्‍यांपैकी एकाचा मारहाणीत मृत्यू

चोरांकडून स्थानिकांवर गोळीबार !

गोवंश चोरी करणार्‍यांकडे बंदुकीसारखी शस्त्रे असणे, यातूनच अशा गुन्ह्यांची व्याप्ती लक्षात येते. अशा चोर्‍यांमागे गोहत्यार्‍यांची टोळी कार्यरत आहे का, हे पाहून त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी. मुळात राष्ट्रीय स्तरावर कठोर गोहत्या प्रतिबंधक कायदा व्हावा, असेच हिंदूंना वाटते ! – संपादक

अररिया (बिहार) – येथील भवानीपूर गावामध्ये गोवंश चोरी करणार्‍या ५० वर्षीय महंमद सिद्दीकी याला स्थानिकांनी चोपल्याने त्याचा मृत्यू झाला. येथे काही जण रात्रीच्या वेळी गोवंश चोरी करून घेऊन जात असतांना लोकांना दिसल्यावर त्यांनी या चोरांचा पाठलाग केला. पाठलागाच्या वेळी या चोरांनी स्थानिकांवर गोळीबारही केला. तरीही स्थानिकांनी या चोरांतील सिद्दीकी याला पकडले आणि त्याला चोपले. त्यातच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी केली जात आहे.

काही दिवसांपूर्वी अररियाच्या पूर्व फतेहपूर गावामध्ये ६ गोवंश चोरून नेण्यात आले होते. चोरट्यांना शोधण्यास गेलेल्यांना या चोरांनी मारहाणही केली होती.