मुंबई – शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपच्या नावे वापरलेल्या आक्षेपार्ह शब्दावर भाजपचे आमदार अतुल भातखळकर आणि भाजपचे अन्य नेते यांनी आक्षेप घेत संजय राऊत यांच्यावर गुन्हा नोंदवावा, यासाठी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्याच्या बाहेर धरणे आंदोलन केले. देहली येथे निलंबित खासदारांच्या धरणे आंदोलनाच्या ठिकाणी शरद पवार आले असता संजय राऊत आसंदी घेऊन येत असतांनाचे छायाचित्र वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाले आहे. यावरून आमदार अतुल भातखळकर यांनी ‘संजय राऊत यांचे गुरु हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नसून शरद पवार आहेत’, असे ट्वीट केले होते. त्यावर प्रतिक्रिया देतांना संजय राऊत यांनी शिवी दिली. यावरून त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्याची मागणी भाजपकडून करण्यात येत आहे.