‘कर्नल टॉड यांचे पुस्तक ‘राजस्थान का इतिहास’ आणि पं. रघुनंदन शर्मा यांचे पुस्तक ‘वैदिक संपति’ यांमध्ये चीनच्या हिंदु राष्ट्राची होण्याला पुष्टी मिळते.
संपूर्ण जंबुद्वीपावर हिंदु साम्राज्य स्थापित होते. जंबुद्वीपावर ९ देश होते. त्यामध्ये ३ होते – हरिवर्ष, भद्राश्व आणि किंपुरुष. या तिन्ही देशांना मिळून आज ‘चीन’ असे म्हटले जाते. चीन प्राचीनकाळी हिंदु राष्ट्र होते. वर्ष १९३४ मध्ये झालेल्या उत्खननात (खोदकामात) चीनचे एक प्राचीन शहर च्वानचोमध्ये १ सहस्र वर्षांपेक्षा अधिक प्राचीन हिंदु मंदिराचे आणि जवळ जवळ एक डझनांहून अधिक गाडलेली पडकी घरे सापडली आहेत. हे क्षेत्र प्राचीन काळी ‘हरिवर्ष’ म्हटले जात होते. वर्तमान काळात चीनमध्ये एकही हिंदु मंदिर नाही; परंतु १ सहस्र वर्षांपूर्वी मुंग राजवंशाच्या काळात दक्षिण चीनच्या फूच्यान प्रांतामध्ये अशा प्रकारची मंदिरे होती. आता केवळ पडक्या जागा शेष राहिल्या आहेत. अरुणाचल प्रदेश किंवा ब्रह्मदेश यांचे रस्ते चीनकडे जात होते आणि तेथूनच येत होते. लेह, लडाख, सिक्किम यांवरूनही लोक चीनकडे ये-जा करत होते; परंतु तेव्हा तिबेट पार करून जावे लागत होते. तिबेटला प्राचीन काळी ‘त्रिविष्टप’ म्हटले जात होते. हा देवलोक आणि गंधर्वलोक यांचा भाग होता. इ.स. ५०० ते ७०० पूर्वीही चीनला ‘महाचीन’ आणि ‘प्राग्यज्योतिष’ म्हटले जात होते. महाभारताच्या सभापर्वामध्ये भारतवर्षाच्या प्राग्यज्योतिषपूर प्रांतांचा उल्लेख मिळतो.
१. विष्णु पुराण, रामायण बालकांड आणि महाभारत यांमध्ये चीनविषयी आढळणारा उल्लेख वास्तविक काही विद्वानांच्या मतानुसार प्राग्यज्योतिष आजकालच्या आसामसह पूर्वाेत्तरातील सर्व ८ राज्यांना म्हटले जात होते, ज्यामध्ये चीनचाही काही भाग समाविष्ट होता. ‘रामायण बालकांड’ ग्रंथाच्या (३०/५ मध्ये) प्राग्यज्योतिषच्या स्थापनेचा उल्लेख आढळतो. ‘विष्णु पुराणा’त या प्रांताचे दुसरे नाव ‘कामरूप (किंपुरुष)’ असे मिळते. यावरून हे स्पष्ट होते की, रामायण काळापासून महाभारत काळापर्यंत आसामपासून चीनच्या सिचुआन प्रांतांपर्यंतचे क्षेत्र प्राग्यज्योतिष हेच होते. ज्याला ‘कामरूप’ म्हटले गेले. कालांतराने त्याचे नाव पालटले गेले.
चिनी यात्री हवेनसांग आणि आत्मबरनीच्या काळात कामरूपला ‘चीन’ आणि वर्तमानातील चीनला ‘महाचीन’ म्हटले जात होते. अर्थशास्त्राचे रचनाकार कौटिल्य यांनीही चीन शब्दाचा उपयोग कामरूपासाठीच केला आहे. यावरून अनुमान लावू शकतो की, कामरूप किंवा प्राग्यज्योतिष प्रांत प्राचीनकाळात आसामपासून ब्रह्मदेश, सिंगापूर, कंबोडिया, चीन, इंडोनेशिया, जावा, सुमात्रा इथपर्यंत पसरलेले होते. हे एक वेगळेच क्षेत्र होते ज्यामध्ये वर्तमान चीनचे जवळजवळ अर्धे क्षेत्र येते. या विशाल प्रांताच्या प्रवासावर एकदा भगवान श्रीकृष्णही गेले होते. महाभारताच्या सभापर्व (८८-१५) मध्ये ते स्वतः म्हणतात की, ‘आम्ही प्राग्यज्योतिषपूरच्या प्रवासात असतांना आमच्या आत्याचा पुत्र शिशुपालाने द्वारिका जाळली होती.’
२. इंग्रजांनी कामरूप क्षेत्राचा इतिहास न शोधण्यामागील कारण चिनी यात्री हवेनसांग (६२९ ई.) यांच्यानुसार त्या काळापूर्वीपासून कामरूपवर एकाच कुल-वंशाचे १ सहस्र राजांचे दीर्घकाळापर्यंत राज्य होते. जर एका राजाला अंदाजे २५ वर्षांचा राज्य करण्याचा काळ समजला, तर २५ सहस्र वर्षांपर्यंत एकाच कुळातील राजांनी कामरूपावर राज्य केले. इंग्रज इतिहासकारांनी कधी कामरूप क्षेत्राच्या २५ सहस्र वर्षीय इतिहासाला शोधण्याचे कष्ट घेतले नाहीत; कारण त्यामुळे आर्य धर्म किंवा हिंदुत्वाचा गौरव स्थापन होतो. कालांतराने महाचीन हाच चीन झाला आणि प्राग्यज्योतिषपूर कामरूप होऊन गेले. पुराणांनुसार शल्यसुद्धा चीनहून आला होता, ज्याला कधी महाचीन म्हटले जात होते.
३. चिनी लोक चंद्रवंशी क्षत्रिय असे म्हटले जाते की, मंगोल, तातार आणि चिनी लोक चंद्रवंशी होते. यामध्ये तातारचे लोक स्वतःला आयचे वंशज म्हणवत होते, हा आय पुरुरवाचा पुत्र आयु होता.(पुरुरवा प्राचीनकाली चंद्रवंशियांचा पूर्वज आहे, ज्याच्या कुळामध्येच कुरू आणि कुरूपासून कौरव झाले.) या आयुच्या वंशामध्येच सम्राट यदु झाले होते आणि त्यांचा नातू हय होता. चिनी लोक या हयला ‘हयु’ म्हणतात आणि आपला पूर्वज मानतात. दुसर्या एका मतानुसार एक तारे (तातार)चा समागम ‘यू’च्या मातेशी झाला होता. त्यापासून ‘यू चा जन्म झाला. अशा प्रकारे तातारांचा अय, चिन्यांचा यू आणि पौराणिकांचा आयु हा एकच व्यक्ती आहे. या तिन्हींचा आदिपुरुष चंद्र होता आणि ते चंद्रवंशी क्षत्रिय आहेत.’
– श्री. गोविंदराज नायडू (साभार : मासिक ‘राष्ट्रबोध’, जून २०१६)