वसीम रिझवी यांचा शिरच्छेद करणार्‍याला ५० लाख रुपये देणार !

भाग्यनगर येथील काँग्रेसचे नेते महंमद फिरोज खान यांची घोषणा

  • अशी प्रक्षोभक घोषणा देणार्‍यांवर कारवाई होत नाही, हे तेलंगाणामधील तेलंगाणा राष्ट्र समितीच्या सरकारला लज्जास्पद ! यातून राज्यात कायदा आणि सुव्यवस्था शिल्लक नाही, हेच स्पष्ट होते ! – संपादक
  • हिंदूंना ‘भगवे आतंकवादी’ ठरवणारी, मोहनदास करमचंद गांधी यांच्या अहिंसक तत्त्वांचा पालन करण्याचे ढोंग करणारी काँग्रेस त्यांच्या या धर्मांध नेत्याच्या घोषणेच्या विरोधात चकार शब्द काढत नाही, हे लक्षात घ्या ! – संपादक
डावीकडून काँग्रेसचे नेते महंमद फिरोज खान आणि जितेंद्र नारायण सिंह त्यागी (पूर्वाश्रमीचे वसीम रिझवी)

भाग्यनगर (तेलंगाणा) – येथील काँग्रेसचे नेते महंमद फिरोज खान यांनी ‘शिया सेंट्रल वक्फ बोर्डा’चे माजी अध्यक्ष तथा नुकताच हिंदु धर्म स्वीकारलेले जितेंद्र नारायण सिंह त्यागी (पूर्वाश्रमीचे वसीम रिझवी) यांचा शिरच्छेद करून ते शीर आणून दिल्यास, त्याला ५० लाख रुपयांचे बक्षिस देण्यात येणार असल्याची घोषणा केली. तसेच नंतर संबंधितांचा खटला लढवण्याचाही व्यय (खर्च) करण्यात येईल, असेही त्यांनी म्हटल्याचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. हा व्हिडिओ १० दिवसांपूर्वीचा असल्याचे सांगण्यात येत आहे. यात खान यांनी रिझवी यांना शिवीगाळही केली आहे. महंमद फिरोज खान यांनी भाग्यनगर येथून काँग्रेसच्या तिकिटावर एम्.आय्.एम्.चे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन औवैसी यांच्याविरोधात लोकसभेची निवडणूक लढवली होती.