जे.एन्.यू.मध्ये बाबरीच्या समर्थानार्थ साम्यवादी विचारसणीच्या विद्यार्थी संघटनांकडून आंदोलन

भारतात मुसलमान आक्रमकांनी हिंदूंची साडेचार लाख मंदिरे पाडली, ३ दशकांपूर्वी धर्मांधांनी काश्मीरमधून साडेचार लाख हिंदूंना पलायन करण्यास भाग पाडले, तसेच तेथील शेकडो मंदिरांवर आक्रमणे केली, यांविषयी साम्यवादी विद्यार्थी संघटनांना आंदोलन करावेसे वाटत नाही, हे लक्षात घ्या ! – संपादक

नवी देहली – येथील वादग्रस्त जवाहरलाल नेहरू विद्यापीठ अर्थात् जे.एन्.यू.मध्ये ६ डिसेंबरच्या रात्री जे.एन्.यू.च्या विद्यार्थी संघटनेने बाबरी ढाच्याच्या समर्थनार्थ आंदोलन केले. या वेळी बाबरीच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली. यासह विद्यार्थी संघटनेचे उपाध्यक्ष साकेत मून यांनी, तसेच आंदोलनात उपस्थित अन्य साम्यवादी विचारांच्या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी बाबरी मशीद पुन्हा उभारण्याची मागणी केली.