‘दैनिक ‘सनातन प्रभात’द्वारे ‘निर्विचार’ किंवा ‘श्री निर्विचाराय नमः।’ हा नामजप करण्यास सांगितला, तसेच ‘कोणत्याही वस्तूकडे पाहून ‘निर्विचार’ किंवा ‘श्री निर्विचाराय नमः।’ हा नामजप करतांना काय जाणवते ?’, हे पहाण्यास सांगितले होते. हा प्रयोग करतांना मला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. प्रथम आकाश आणि त्यानंतर तुळस यांकडे पहात ‘निर्विचार’ हा नामजप करतांना माझ्या मनातील विचार लवकर थांबले, माझा श्वास संथ झाला आणि मला शांत वाटले.
२. ‘निर्विचार’ हा नामजप करतांना डोळे मिटल्यावर १ मिनिटापर्यंत माझ्या मनात कुठलाही विचार आला नाही. त्यानंतर मला १ – २ जांभया आल्या. नंतर हळूहळू माझे ध्यान लागले. त्या वेळी मला डोळे उघडता येत नव्हते. ‘संथ श्वास आणि शांत स्थिती यांतून बाहेर पडू नये’, असे मला वाटत होते.
३. त्यानंतर थोड्या वेळाने नामजपला बसल्यावर काही वेळ माझा ‘निर्गुण’ हा नामजप झाला. नंतर ‘निर्विचार’ हा नामजप करतांना सुमारे २० मिनिटांमध्ये माझ्या मनात २ – ३ विचार आले. अन्य वेळी मला निर्विचार स्थिती अनुभवता आली. माझा नामजप हळूहळू होत होता. माझा श्वास संथ होता आणि मला शांत वाटत होते. हे लिहितांनाही मला शांत वाटत आहे आणि माझा श्वास संथ आहे. गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता !’
– आधुनिक वैद्य मिलिंद खरे, लेस्टर, इंग्लंड. (१४.५.२०२१) ०
खोक्यांचे उपाय करतांना आलेली अनुभूती‘माझ्या घरात आसंदीच्या डाव्या बाजूला पलंग आहे. त्यावर ३ खोके ठेवले होते. सर्वांत मागे मोठा खोका आहे. त्याच्या १ फूट पुढे मध्यम खोका आणि त्याच्या पुढे लहान खोका, अशी खोक्यांची रचना आहे. याविषयी मला जाणवले, ‘मागील दोन खोक्यांपेक्षा तिसर्या खोक्यात, म्हणजे सर्वांत लहान खोक्यात पुष्कळ चैतन्य जाणवून उपाय चांगले होत आहेत.’ परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’ – आधुनिक वैद्य मिलिंद खरे, लेस्टर, इंग्लंड. (१४.५.२०२१) |
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |