१. ‘सद्गुरु अनुराधा वाडेकर यांचे पाय चेपत असतांना माझ्या अनाहतचक्राच्या ठिकाणी गारवा जाणवून मला आनंदाच्या संवेदना जाणवल्या. त्यांच्या चरणांचा स्पर्श पुष्कळ मऊ होता.
२. त्यांचे तळपाय दाबतांना ‘त्यांच्या चरणांच्या धुळीला स्पर्श करायला मिळत आहे’, याचा मला आनंद होत होता. ‘मी त्यांच्या चरणांची धूळ आहे’, असे मला वाटत होते.
३. त्यांचे पाय चेपून झाल्यावर मला घाम आला. तेव्हा ‘माझ्या देहावरील काळ्या शक्तीचे आवरण नष्ट झाले आहे’, असे मला वाटले. त्यामुळे मला आनंद होऊन माझा उत्साह वाढला.
परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांच्या कृपेमुळेच मला ते अनुभवता आले. त्यासाठी मी त्यांच्या चरणी कृतज्ञ आहे.’
– कु. विशाखा चौधरी (वय २२ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.११.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या/संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |