नागपूर – शहरासमवेत विदर्भात थंडीचा कडाका वाढू लागला आहे. गेल्या ३ दिवसांत विदर्भाच्या तापमानात ६ अंशाची घसरण झाली आहे. यंदाच्या हिवाळ्यात प्रथमच पारा १३ अंशाच्या खाली गेला आहे. देशात पहाडी भागात बर्फवृष्टी चालू आहे. पुढील आठवड्यात मध्य भारतात ढगांची गर्दी दिसून येईल. त्यामुळे रात्रीच्या तापमानात किंचित वाढ होईल, असा अंदाज आहे.