‘जिझिया करा’चे नवे रूप म्हणजे ‘हलाल प्रमाणपत्र’ ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

श्री. रमेश शिंदे

भारतात इस्लामी बँकेचा प्रभाव अल्प होत असल्याने अल्पसंख्यांकांकडून ‘हलाल अर्थव्यवस्था’ चालू करण्यात आली. ‘हलाल प्रमाणपत्र’साठी खासगी संस्थांची निर्मिती करण्यात आली. एका उत्पादनाला हलाल प्रमाणपत्र देण्यासाठी भारतात २० सहस्र रुपये वार्षिक शुल्क आकारले जाते. ‘जिझिया करा’चे नवे रूप म्हणजे ‘हलाल प्रमाणपत्र’ ! पूर्वी इस्लामी राजवटीत एखाद्या हिंदूला इस्लाममध्ये धर्मांतरित न होता हिंदू रहायचे असेल, तर ‘जिझिया’ कर भरावा लागत असे. सध्या मुसलमानांनी ‘आमच्या उत्पादनासाठी हलाल प्रमाणपत्र शुल्क भरावे लागेल’, अशी स्थिती निर्माण केली.