‘अमृतमय गुरुगाथा’ ही ग्रंथमालिका चैतन्यमय असल्याचे सिद्ध करणारी वैज्ञानिक चाचणी

  • ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

  • आध्यात्मिक ग्रंथांविषयी अद्वितीय संशोधन करणारे  महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय

यु.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. आशिष सावंत

‘साधक ते शिष्य’ हा अध्यात्मातील साधनाप्रवास करतांना शिष्याच्या मनातील श्री गुरूंप्रतीचा भाव दिवसेंदिवस वृद्धींगत होत जातो. ‘गुरु’ हेच शिष्याचे सर्वस्व बनतात. इंदूर (मध्यप्रदेश) येथील थोर संत प.पू. भक्तराज महाराज यांच्या शिष्या डॉ. (सौ.) कुंदा आठवले यांनी त्यांच्या गेल्या ३०-३५ वर्षांतील साधनाप्रवास शब्दबद्ध केला आहे. या साधनाप्रवासाची ‘अमृतमय गुरुगाथा’ ही ग्रंथमालिका नुकतीच प्रकाशित झाली. (आतापर्यंत या मालिकेतील ४ खंड प्रकाशित झाले आहेत.)

डॉ. (सौ.) कुंदा आठवले यांनी २३.७.२०२१ या गुरुपौर्णिमेच्या दिवशी ‘अमृतमय गुरुगाथा : खंड १ ते ४’ या ग्रंथांचा एक संच इंदूर (मध्यप्रदेश) येथील ‘भक्तवात्सल्याश्रमा’तील प.पू. भक्तराज महाराज यांच्या पादुकांवर आणि असाच दुसरा संच प.पू. भक्तराज महाराज यांचे गुरु श्री अनंतानंद साईश यांच्या पादुकांवर अत्यंत कृतज्ञताभावाने समर्पित (अर्पण) केला. या संचातील प्रत्येक ग्रंथातून पुष्कळ प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होते. या प्रत्येक ग्रंथातून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांचा (चैतन्याचा) विज्ञानाद्वारे अभ्यास करण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने या ग्रंथांची ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे चाचणी केली. या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन आणि त्या निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.

माझ्या साधनाप्रवासातील प्रसंगांची आठवण करून देणारी ‘अमृतमय गुरुगाथा’ !

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘वयोमानामुळे मला माझ्या साधनाप्रवासातील वैयक्तिक स्तरावरील प्रसंग आठवत नाहीत. माझे गुरु प.पू. भक्तराज महाराज यांच्या संदर्भात डॉ. (सौ.) कुंदा आठवले यांनी लिहिलेली ‘अमृतमय गुरुगाथा’ ही ग्रंथमालिका वाचल्यावर मला बरेचसे प्रसंग आठवले.’

– (परात्पर गुरु) डॉ. जयंत आठवले (२०.७.२०२१)

१. चाचणीतील निरीक्षणे आणि त्यांचे विवेचन

डॉ. (सौ.) कुंदा आठवले लिखित ‘अमृतमय गुरुगाथा : खंड १ ते ४’ या ग्रंथांची आणि तुलनेसाठी म्हणून सर्वसाधारण लेखकाने एका संतांविषयी लिहिलेल्या ३ ग्रंथांची ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे निरीक्षणे घेण्यात आली. डॉ. (सौ.) कुंदा आठवले यांनी श्री गुरुपादुकांवर अर्पण केलेल्या ग्रंथांचीही निरीक्षणे घेण्यात आली.

१ अ. डॉ. (सौ.) कुंदा आठवले यांनी लिहिलेल्या ग्रंथांतून पुष्कळ चैतन्य प्रक्षेपित होणे : सर्वसाधारण लेखकाने संतांविषयी लिहिलेल्या ग्रंथांमध्ये पुष्कळ प्रमाणात नकारात्मक स्पंदने आणि अल्प प्रमाणात सकारात्मक स्पंदने आढळून आली. याउलट प.पू. भक्तराज महाराज यांच्या शिष्या डॉ. (सौ.) कुंदा आठवले यांनी लिहिलेल्या ग्रंथांमध्ये नकारात्मक स्पंदने नसून पुष्कळ सकारात्मक स्पंदने आढळून आली.

२. डॉ. (सौ.) कुंदाताई यांनी श्री गुरूंच्या पादुकांवर समर्पित केलेल्या ग्रंथांतून पुष्कळ अधिक प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होणे

डॉ. (सौ.) कुंदा आठवले यांनी श्री गुरूंच्या पादुकांवर समर्पित केलेल्या ग्रंथांमध्ये नकारात्मक स्पंदने नसून पुष्कळ सकारात्मक स्पंदने आहेत. विशेष म्हणजे गुरुपादुकांवर समर्पित न केलेल्या ग्रंथांच्या तुलनेत गुरुपादुकांवर समर्पित केलेल्या दोन्ही संचांतील ग्रंथांत सकारात्मक ऊर्जेचे प्रमाण पुष्कळ अधिक आहे.

२ अ. चाचणीतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण

सौ. मधुरा कर्वे

२ अ १. सर्वसाधारण लेखकाचे लिखाण अधिकतर बुद्धीच्या स्तरावरील असल्याने त्याच्या ग्रंथांत नकारात्मक स्पंदने आढळून येणे : सर्वसाधारण लेखकाने संतांविषयी लिहिलेल्या ग्रंथांमध्ये पुष्कळ प्रमाणात नकारात्मक स्पंदने आणि अल्प प्रमाणात सकारात्मक स्पंदने आढळून आली. याचे कारण हे की, सर्वसाधारण लेखक त्या विषयाचा त्याने केलेला अभ्यास, त्याला आलेले विविध अनुभव इत्यादींचा आधार घेऊन लिखाण करतो. हे लिखाण अधिकतर बुद्धीच्या स्तरावर असते. त्यामुळे त्यामध्ये अनेक त्रुटी राहू शकतात. त्रुटी जेवढ्या अधिक असतात, तेवढा त्या लिखाणातून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांवर नकारात्मक परिणाम अधिक होतो. चाचणीसाठी निवडलेले तिन्ही ग्रंथ संतांविषयी असल्याने त्यात अल्प प्रमाणात सकारात्मक स्पंदनेही आढळून आली.

२ अ २. डॉ. (सौ.) कुंदाताई यांचे लिखाण भावाच्या स्तरावर असल्याने त्यांच्या ग्रंथांतून पुष्कळ चैतन्य प्रक्षेपित होणे : डॉ. (सौ.) कुंदा आठवले यांनी त्यांचा ३० – ३५ वर्षांचा साधनाप्रवास पूर्णपणे भावाच्या स्तरावर लिहिला आहे.

श्री गुरूंप्रतीचा भाव त्यांच्या लिखाणातून पदोपदी अनुभवण्यास येतो. डॉ. (सौ.) कुंदा आठवले स्वतः उत्तम लेखिका आहेत. त्यांचे सोप्या भाषेतील ओघवते लिखाण मनाला भावते आणि त्यातून आनंद मिळतो. डॉ. (सौ.) कुंदा आठवले यांनी लिहिलेल्या ग्रंथांतून भाव आणि चैतन्य यांची स्पंदने प्रक्षेपित होत आहेत. त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांमध्ये पुष्कळ प्रमाणात सकारात्मक स्पंदने आढळून आली.

२ अ ३. डॉ. (सौ.) कुंदाताई यांनी कृतज्ञताभावाने श्री गुरूंच्या पादुकांवर समर्पित केलेल्या ग्रंथांतून पुष्कळ अधिक चैतन्य प्रक्षेपित होणे : श्री गुरूंच्या पादुका म्हणजे श्री गुरूंचे निर्गुण रूप ! डॉ. (सौ.) कुंदा आठवले यांनी गुरुपौर्णिमेला अत्यंत कृतज्ञताभावाने त्यांचे गुरु प.पू. भक्तराज महाराज यांच्या पादुकांवर आणि प.पू. भक्तराज महाराज यांचे गुरु श्री अनंतानंद साईश यांच्या पादुकांवर ‘अमृतमय गुरुगाथा’ या मालिकेतील ४ ग्रंथांचा प्रत्येकी १ संच समर्पित केला. या ग्रंथांमध्ये श्री गुरूंचे चैतन्य पुष्कळ प्रमाणात आकृष्ट झाले. यामुळे श्री गुरुचरणी समर्पित केलेल्या ग्रंथांमध्ये अधिक प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आढळून आली. यातून गुरुपादुकांवर ग्रंथ समर्पित करण्याचे महत्त्वही लक्षात येते.

थोडक्यात ‘शिष्यामध्ये श्री गुरूंच्या प्रती अनन्यभाव असल्यास श्री गुरुच शिष्याकडून भावपूर्ण लिखाण करवून घेतात आणि शिष्यावर कृपेचा वर्षाव करतात’, हेच यातून शिकायला मिळते. ‘या वैज्ञानिक चाचणीतून हे शिकायला मिळाले’, याकरता श्री गुरूंच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय’, गोवा. (११.९.२०२१)

ई-मेल : [email protected]

।। हरि ॐ तत्सत् ।।

डॉ. (सौ.) कुंदा आठवले यांच्या संतभेटी आणि तीर्थयात्रा

लेखिका : डॉ. (सौ.) कुंदा जयंत आठवले यांचे मनोगत

सनातनचा नूतन ग्रंथ : अमृतमय गुरुगाथा : खंड ५

‘आध्यात्मिक वाटचाल करतांना आम्हाला अनेक संत-महात्म्यांच्या भेटीचा योग आला. त्यामुळे अध्यात्माच्या विविध अंगांचा परिचय झाला आणि मला वेगवेगळ्या उपासना पद्धतींची तोंडओळख झाली. या संतांच्या उक्ती आणि कृती यांमधून अध्यात्मविश्वाचे विविध पैलू समोर आले. ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ या उक्तीप्रमाणे प्रत्येक संत-महात्म्यांची अध्यात्माबद्दलची वेगवेगळी धारणा आणि त्यांची वेगवेगळ्या प्रकारची जीवनशैलीही अनुभवण्यास आली. त्यांची खडतर उपासना, जनकल्याणासाठी झटणे आणि त्यासाठी साधकांना मार्गदर्शन करणे इत्यादी गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या होत्या. त्यांच्या मार्गदर्शनातून आम्हाला बर्‍याच नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यामुळे आमचे अध्यात्मविश्व समृद्ध झाले. आम्ही जे काही अनुभवले, ते इतरांनाही ज्ञात व्हावे; म्हणूनच हे लिखाण माझ्या हातून घडले. ही ईश्वरेच्छाच असावी !

त्याचबरोबर अध्यात्माच्या वाटचालीच्या वेळी काही प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांना भेटी द्यायचा योग आला. या भेटींच्या वेळी काही विलक्षण अनुभुतींना सामोरे जावे लागले. या यात्रांच्या वेळी माझ्याबरोबर इतर साधकमंडळीही होती. त्यांनाही हे अनुभवता आले आणि अामच्या सगळ्यांचीच श्रद्धा वाढायला साहाय्य झाले. त्यामुळे या घटनांबद्दलचे लिखाण करण्याची मला प्रेरणा मिळाली. हेही ‘ईश्वरेच्छेने आणि गुरुकृपेनेच घडले’, असे मला वाटते. त्यामुळे पाचवा खंड प्रत्यक्षात उतरला. ‘ही सेवा गोड मानून घ्यावी’, अशी विनंती !’

– डॉ. (सौ.) कुंदा जयंत आठवले, गोवा (१३.९.२०२१)

सनातनच्या ग्रंथांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी SanatanShop.com

संपर्क : ९३२२३१५३१७