तेलंगाणा आणि आंध्रप्रदेश राज्यांतील ८३.३ टक्के महिलांना पतीकडून होणारी मारहाण योग्य वाटते !

राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षणाचा निष्कर्ष

नवी देहली – राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षणात तेलंगाणा आणि आंध्रप्रदेश या राज्यांतील ८३.३ टक्के विवाहित महिलांना पतीकडून त्यांना होणारी मारहाण योग्य वाटते. हिमाचल प्रदेशातील १४.८ टक्के महिलांनी अशी मारहाण योग्य असल्याचे सांगितले. कर्नाटकातील ८१.९ पुरुषांनीही पतीकडून पत्नीला होणारी मारहाण योग्य  असल्याचे मत व्यक्त  केलेआहे.

राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षणात देशातील १८ राज्यांत कौंटुंबिक हिंसेवर महिला आणि पुरुष यांचे मत घेण्यात आले होते. यात महिला आणि पुरुष यांना ‘पतीने पत्नीला मारहाण करणे योग्य वाटते कि अयोग्य?’ असा प्रश्‍न विचारण्यात आला होता. यात न सांगता घरातून बाहेर जाणे, घर आणि मुले यांच्याकडे दुर्लक्ष करणे, वाद घालणे, शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिणे, चांगले जेवण न बनवणे, विवाहबाह्य संबंध असणे आदी प्रश्‍न होते.