देशात बिहार सर्वाधिक गरीब राज्य !

  • नीती आयोगाचा गरिबी निर्देशांक घोषित

  • महाराष्ट्र १७ व्या स्थानी, तर केरळचा क्रमांक सर्वांत शेवट

स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही बिहारसारख्या राज्यातील अर्ध्याहून अधिक लोकसंख्या गरीब रहाते, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद ! – संपादक

नवी देहली – नीती आयोगाच्या गरिबी निर्देशांकाच्या अहवालानुसार, बिहारमधील ५१.९१ टक्के जनता गरीब आहे. झारखंडमध्ये हेच प्रमाण ४२.१६ टक्के, तर उत्तरप्रदेशमध्ये ३७.७९ टक्के आहे. मध्यप्रदेशातील ३६.६५ टक्के, तर मिझोरममध्ये ३२.६७ टक्के गरीब आहे. गरिबीत महाराष्ट्राचा १७ वा क्रमांक असून राज्यातील एकूण १४.८५ टक्के जनता गरीब आहे. यानंतर तेलंगाणा १३.७४ टक्के, कर्नाटक १३.१६ टक्के, आंध्रप्रदेश १२.३१ टक्के आणि हरियाणा येथील १२.२८ टक्के जनता गरीब आहे. तमिळनाडूतील ४.८९ टक्के , सिक्कीममधील ३.८२ टक्के, तर गोव्यातील ३.७६ टक्के जनता गरीब आहे. गरिबीत केरळ राज्य सर्वांत शेवटच्या क्रमांकावर असून तेथील केवळ ०.७१ टक्के जनता गरीब आहे.