विमा घोटाळ्याच्या प्रकरणी उत्तरप्रदेशातील २८ अधिवक्ते निलंबित !

‘बार काऊंसिल ऑफ इंडिया’ची कारवाई

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – बनावट वाहन विमा दावे प्रविष्ट केल्याच्या प्रकरणी ‘बार काऊंसिल ऑफ इंडिया’ने उत्तरप्रदेशातील २८ अधिवक्त्यांना निलंबित केले आहे. हा घोटाळा उघडकीस अल्यानंतर अलाहाबाद उच्च न्यायालयाने विशेष अन्वेषण पथकाला याचे अन्वेषण करण्याचा आदेश दिला होता. या घोटाळ्याद्वारे विमा आस्थापनांची ३०० कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. उत्तरप्रदेश बार काऊंसिलला या अधिवक्त्यांची ३ मासांत चौकशी करून त्याचा अहवाल सादर करण्याचाही आदेश न्यायालयाने दिला आहे. गेल्या ६ वर्षांपासून या घोटाळ्याचे अन्वेषण चालू आहे. (अन्वेषण ६ वर्षे चालू असेल, तर आरोपींना शिक्षा किती वर्षांनी होणार ? असे कूर्मगतीने चालणारे अन्वेषण काय कामाचे ? – संपादक)