भोपाळमधील मोतीलाल महाविद्यालयातील ‘मजार’मुळे विद्यार्थी आणि कर्मचारी यांना धोका !

खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांच्याकडून जिल्हाधिकारी आणि आयुक्त यांना पत्र

खासदार साध्वी प्रज्ञासिंह

भोपाळ (मध्यप्रदेश) – मोतीलाल विज्ञान महाविद्यालयाच्या परिसरात असलेल्या  ‘मजार’(इस्लामी पीर किंवा फकिर यांची समाधी)विषयी येथील भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी प्रश्‍न उपस्थित केला आहे. या प्रकरणी त्यांनी जिल्हाधिकारी आणि आयुक्त यांना पत्र लिहून कारवाई करण्याची मागणी केली आहे. खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांनी पत्रात म्हटले की, महाविद्यालयात मजार असल्याने महाविद्यालयाच्या बाहेरील लोकही येथे येतात. त्यामुळे महाविद्यालयातील विद्यार्थी आणि कर्मचारी यांना धोका निर्माण झाला आहे. यापूर्वी साध्वींनी शहरातील एका शाळेमधील अवैध मशीद आणि तेथे नमाजासाठी एकत्र येणारे मुसलमान यांच्याविरोधातही आवाज उठवला होता.