भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूंना दिले जाणार ‘हलाल मांस!’

  • भारतीय क्रिकेट संघामध्ये ८० टक्के खेळाडू हिंदु असतांना त्यांना हलाल मांस का दिले जाणार आहे ?, याचे उत्तर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने हिंदूंना दिले पाहिजे ! तसेच हिंदु खेळाडूंनाही याचे कारण विचारले पाहिजे आणि अशा मांसावर बहिष्कार घातला पाहिजे; मात्र हिंदु खेळाडूंना धर्मशिक्षण नसल्याने आणि त्यांना धर्माच्या अभिमानापेक्षा पैशांचे महत्त्व अधिक दिसून येत असल्याने असे काही होण्याची शक्यता अल्पच आहे ! – संपादक
  • आज दुर्दैवाने भारतातील असंख्य युवा पिढीचे आदर्श हे क्रिकेटपटू असल्याने उद्या तेही क्रिकेटपटूंप्रमाणे हलाल मांस खाऊ लागतील ! भारतात हलाल मांसाचा खप वाढवण्याचे हे सुनियोजित षड्यंत्र आहे, हे जाणा ! – संपादक

नवी देहली – भारतीय क्रिकेट संघाला स्पर्धेच्या कालावधीत गोमांस किंवा डुकराचे मांस खाण्यास दिले जाणार नाही; मात्र अन्य वेळी देण्यात येणारे कोणतेही मांस हे ‘हलाल’ मांस असणार आहे, असे ‘इंडिया टुडे’ समुहाच्या ‘स्पोर्ट्स तक’ या वृत्तवाहिनीने हे वृत्त दिले आहे.

‘हलाल’ मांस म्हणजे काय ?

हलाल पद्धतीचे मांस मिळण्यासाठी प्राण्याच्या गळ्याची नस चिरली जाते आणि प्राण्याला सोडून दिले जाते. त्यामुळे त्या प्राण्याचे मोठ्या प्रमाणात रक्त वाहून त्याचा तडफडून मृत्यू होतो. अशा तडफडून मारलेल्या प्राण्याच्या मांसाला ‘हलाल मांस’ म्हणतात. या प्राण्याचा बळी देतांना त्याचा तोंडवळा मक्केच्या दिशेने केला जातो.