भारतात महिलांची सकाळी पूजा केली जाते आणि रात्री बलात्कार ! – अभिनेते आणि विनोदी कलाकार वीर दास

विदेशात जाऊन अशी विधाने करून भारताची अपकीर्ती करणार्‍यांवर सरकारने गुन्हे नोंदवून त्यांना कारागृहात टाकणे आवश्यक आहे. त्यामुळे यापुढे अन्य कुणाचेही अशी विधाने करण्याचे धाडस होणार नाही ! – संपादक

अभिनेते आणि विनोदी कलाकार वीर दास

नवी देहली – अमेरिकेत एका सार्वजनिक कार्यक्रमात अभिनेते आणि विनोदी कलाकार वीर दास यांनी भारताचा अवमान केल्याच्या प्रकरणावरून त्यांच्यावर टीका होत आहे.


१. वीर दास यांनी त्यांच्या ‘यू ट्यूब चॅनल’वर ‘आय कम फ्रॉम टू इंडियाज्’ (मी २ भारतातून आलो आहे.) हा व्हिडिओ प्रसारित केला आहे. अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसी येथील ‘जॉन एफ् केनेडी सेंटर’ येथे त्याने केलेल्या सादरीकरणाचा हा व्हिडिओ होता. ६ मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये दास याने, ‘मी अशा भारतातून आलो आहे, जेथे दिवसा महिलांची पूजा केली जाते आणि रात्री त्यांच्यावर बलात्कार होतो. मी अशा भारतातून आलो आहे जेथे हवेचा गुणवत्ता निर्देशांक ९०० (हा निर्देशांत ५० पेक्षा अल्प असणे आवश्यक आहे.) आहे, तरीही आम्ही आमच्या घराच्या छतावर झोपतो आणि रात्री चांदण्या मोजतो’, असे म्हटले आहे.

२. वीर दास यांनी त्यांच्यावर होत असलेल्या टीकेवरून स्पष्टीकरण देतांना म्हणाले, ‘‘माझा देशाचा अपमान करण्याचा उद्देश नव्हता, तर अशा सर्व प्रकरणांनंतरही देश ‘महान’ असल्याची आठवण करून देण्याचा हेतू होता. या व्हिडिओमध्ये एकाच विषयावर दोन भिन्न विचार असलेल्या लोकांविषयी बोलले गेले असून हे कुठले रहस्य नाही, जे लोकांना ठाऊक नाही.’’