तिरुपती बालाजी मंदिरातील पूजेमध्ये आम्ही हस्तक्षेप करू शकत नाही ! – सर्वोच्च न्यायालय

मशिदीमध्ये नमाजपठण कसे करावे ? चर्चमध्ये प्रार्थना कशी करावी ? या सूत्रांविषयी कधी कुणी न्यायालयात जात नाही, हे लक्षात घ्या ! – संपादक

तिरुपती बालाजी मंदिर

नवी देहली – कोणत्याही मंदिरात पूजा कशी करावी, हे ठरवण्याचे काम न्यायालयाचे नाही. नारळ कसा वाढवावा ?, आरती कशी करावी ? हे न्यायालय ठरवू शकत नाही. मंदिरांच्या पूजाविधींमध्ये न्यायालय हस्तेक्षप करू शकत नाही, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने एक जनहित याचिकेवर निर्णय दिला. न्यायालयाने असेही म्हटले की, एखाद्या ठिकाणी जर कुठली कमतरता असेल, तर त्याविषयी आम्ही सांगू शकतो; मात्र पूजा करण्याच्या पद्धतीत आम्ही हस्तक्षेप करू शकत नाही.