नेपाळ भारतीय सीमेतील भागांत उपग्रहाद्वारे जनगणना करणार

नेपाळने सीमा ओलांडू नये ! – भारताची चेतावणी

काठमांडू (नेपाळ) – नेपाळमध्ये ११ नोव्हेंबरपासून १२ व्या जनगणनेला प्रारंभ झाला आहे. नेपाळने भारताच्या सीमेवरील काही भागांवर दावा केला आहे. तेथे उपग्रहाद्वारे जनगणना केली जाऊ शकते, असे नेपाळने म्हटले आहे. त्यावर भारताने नेपाळला सीमा न ओलांडण्याची चेतावणी दिली आहे.

१. नेपाळच्या सांख्यिकी विभागाचे महासंचालक नेबिन लाल श्रेष्ठ म्हणाले की, आम्ही देशाच्या अधिकृत मानचित्रातील सर्व ठिकाणी जनगणना करणार आहोत. भारत सरकारने अनुमती दिल्यास आम्ही लिपुलेख, कालापानी आणि लिंपियाधुरा या भागांतही घरोघर जाऊन माहिती गोळा करणार आहोत. अनुमती मिळाली नाही, तर आमच्याकडे काहीही पर्याय उपलब्ध नाही; म्हणूनच उपग्रहाद्वारे घेतलेल्या छायाचित्रांच्या साह्याने ही जनगणनेची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. उपग्रहाद्वारे आम्ही या क्षेत्रातील घरे, तसेच तेथील रहिवासी यांच्या संख्येचा अंदाज लावणार आहोत.

२. यावर भारताने म्हटले की, नेपाळकडून भारताच्या सीमेमध्ये काही हालचाली झाल्यास त्या मुळीच खपवून घेतल्या जाणार नाहीत.