त्रिपुरा राज्यात मशिदी पाडल्याच्या कथित घटनांचे पडसाद
|
|
मुंबई – त्रिपुरा राज्यात काही मशिदी पाडल्याच्या कथित घटनांच्या निषेधार्थ भिवंडी, मालेगाव, मनमाड, अमरावती, हिंगोली, नांदेड आणि सांगलीतील ईश्वरपूर (इस्लामपूर) या ठिकाणी धर्मांधांनी शुक्रवार, १२ नोव्हेंबर या दिवशी नमाजानंतर मोर्चा काढला. काही ठिकाणी धर्मांधांनी मोर्च्याच्या वेळी नेहमीप्रमाणे दुकाने फोडून, रस्त्यावरील वाहनांची हानी करून दंगलसदृश वातावरण निर्माण केले. यासह त्यांनी या परिसरांत दहशतीचेही वातावरण निर्माण केले.
बांगलादेशात हिंदूंवर जे प्रचंड अत्याचार झाले, त्यानंतर त्रिपुरा राज्यात मशिदी पाडल्याचे आरोप करण्यात आले. त्याचा निषेध म्हणून हे मोर्चे काढल्याचे सांगितले जात आहे. (धर्मांधांकडून एकाच दिवशी विविध ठिकाणी मोर्चे काढणे आणि त्यांत दंगलसदृश वातावरण निर्माण करणे, यावरून ‘दहशत पसरवण्याची कृती धर्मांध कशी ठरवून करतात’, हेच पुन्हा पुन्हा सिद्ध होते ! – संपादक) या हिंसाचारामध्ये नांदेड येथे २ पोलीस घायाळ झाले, तर अमरावती येथे काही पोलीस घायाळ झाले.
भिवंडी येथे मोर्च्यात अनेक राजकीय पक्षांचा पाठिंबा !
येथे ‘रझा अकादमी’ने काढलेल्या मोर्च्याला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि एम्.आय.एम्. या राजकीय पक्षांनी पाठिंबा दर्शवला होता. धर्मांधांवर नियंत्रण ठेवण्यासाठी येथे ८०० पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
मालेगाव येथे विनाअनुमती मोर्चा : धर्मांधांकडून दगडफेक !
मालेगाव येथे ‘सुन्नी जमियतुल उलेमा’ आणि ‘रझा अकादमी’ यांनी मोर्चा काढला होता. या मोर्च्याला पोलिसांची अनुमती नव्हती. येथे काळे ध्वज लावून बंद पाळण्यात आला. या वेळी धर्मांधांनी प्रचंड प्रमाणात दगडफेक करून दुकानांची हानी केली. त्यामुळे रस्त्यांवर दगडांचा खच पडला होता. येथील यंत्रमाग कामगार आणि मुसलमान व्यापारी यांनी त्यांचे व्यवसाय बंद ठेवले होते.
अमरावती येथेही विनाअनुमती मोर्चा : हिंदूंची दुकाने फोडली !
अमरावती येथेही धर्मांधांनी अनुमती न घेता मोर्चा काढला होता. (धर्मांधांना पोलिसांचे काडीचेही भय वाटत नाही, हेच यावरून सिद्ध होते. अशांवर आता कठोर कारवाई झाली, तरच पुढील दंगली टळू शकतील ! – संपादक) धर्मांधांकडून येथे मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली. या वेळी हिंदु व्यापार्यांची दुकाने फोडण्यात आली. यामध्ये काही हिंदु व्यापारी घायाळ झाले.
नांदेडमध्ये गाड्या जाळल्या !
नांदेड येथे रस्त्यावर गाड्या जाळण्यात आल्या. दुकाने बंद ठेवण्यात आली होती. एका हिंदूच्या मिठाईच्या दुकानाची तोडफोड करण्यात आली. धर्मांध तरुण ‘इतरांना भय वाटेल’, अशा प्रकारे रस्त्यांवर आरडाओरडा करत फिरत होते.
ईश्वरपूर (सांगली) येथे त्रिपुरा राज्यशासन विसर्जित करण्याची मागणी !
त्रिपुरा राज्यात झालेल्या हिंसाचारात अनेक मशिदी पाडल्या गेल्याचा दावा करून ‘त्रिपुरा राज्यातील शासन विसर्जित करावे’, अशी मागणी ईश्वरपूर (सांगली) येथे काढलेल्या मोर्च्यात करण्यात आली.
दोषींवर कठोर कारवाई करू ! – शंभूराजे देसाई, गृहराज्यमंत्रीया घटनांच्या मुळाशी जाऊ. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. हे कुणी केले ?, हे शोधून कारवाई करू. काही जण हे जाणीवपूर्वक करत आहेत. जनतेची सुरक्षा हे आमचे प्रथम प्राधान्य आहे. …तर हिंदूंचे पण मोर्चे निघतील ! – भाजपचे आमदार नितेश राणेयाविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ‘हे मोर्चे थांबले नाहीत, तर हिंदूंचे पण मोर्चे निघतील, हे राज्य सरकारने लक्षात ठेवावे’, अशी चेतावणी दिली. |